Pune Railway Station google
मुंबई/पुणे

Pune Railway Station: पुणे यार्ड रिमॉडेलिंग, ६ नवीन प्लॅटफॉर्म; पुणे रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट!

Pune Yard Remodeling : पुणे रेल्वे स्थानकाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानकावरच्या समस्यांना सामोरं जावं लागणार नाही. तसेच प्रवास जलद आणि सोयीस्कर होणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता स्थानकाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात येणार आहे. प्रवाशांची गर्दी यामुळे कमी होईल आणि प्रवासही सोयीस्कर होईल. केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव आज दिनांक १७ जून रोजी पुणे रेल्वे स्थानकावर ६ नवीन प्लॅटफॉर्म, यार्ड रिमॉडेलिंग आणि विविध पायाभूत सुविधांच्या विकासकामांची पायाभरणी करणार आहेत.

पुणे जंक्शन हे मध्य रेल्वेवरचे सर्वात जास्त वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. तिथे दररोज २०० पेक्षा जास्त प्रवासी गाड्यांनी ये-जा करतात. तर रोज १.५ लाख प्रवासी प्रवास करतात. सध्याची व्यवस्था क्षमतेच्या मर्यादेपर्यंत पोहोचल्याने स्थानकाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्याल आला आहे.

६ नवीन प्लॅटफॉर्मची उभारणी

प्रवाशांची वाढती संख्या आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाढीचा अंदाज यामध्ये घेतला आहे. ७ ते १२ क्रमांकाचे सहा नवीन प्लॅटफॉर्म बांधण्यात येईल. तसेच २ ते ६ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार करून २४ ते २६ डब्यांच्या गाड्या सहजपणे हाताळता येणार आहेत.

स्कायवॉकची सुविधा

स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी आर.बी. मिल रोडच्या बाजूला तिसरा प्रवेश-निर्गमन गेट उभारण्यात येणार आहे. तिथे बुकिंग ऑफिस, प्रतीक्षालय, प्रसाधनगृहे आणि इतर सुविधाही देण्यात येतील असतील. तसेच जुन्या आणि नव्या प्लॅटफॉर्मना जोडणारा स्कायवॉक तसेच ६ मीटर रुंद पादचारी पूलही बांधण्यात येणार आहे.

रेल्वे वाहतूक जास्त सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली बसवण्यात येणार आहे. तसेच रेल्वे इंजिनांच्या देखभालीसाठी आवश्यक सुविधा विकसित केल्या जातील. याने स्थानकावरील गर्दी कमी होईल आणि या भागातल्या प्रवाशांना जास्त चांगली आणि परवडणारी सुविधा मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flight Ticket Rate : कोकणवासियांसाठी मोठी खूशखबर! आता विमानाने करा स्वस्त अन् मस्त प्रवास; पाहा काय आहेत तिकिटाचे दर

Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवापूर्वी घरातून बाहेर काढा 5 वस्तू; नकारात्मक उर्जा दूर होऊन घर होईल शुद्ध

Old Pension Scheme : जुनी पेन्शन मिळत नसल्याने शिक्षक आक्रमक! सरकारला दिला थेट इशारा, आता काय होणार?

Heart-Diabetes : डायबिटीज अन् हार्टच्या रुग्णांनी दिवसातून किती वेळा खावं? डॉक्टरांनी सांगितला खाण्याचा योग्य नियम

"गणपती उत्सवात दंगली घडवल्या जातील!" राज ठाकरेंचा अत्यंत खळबळजनक दावा; महाराष्ट्राला सतर्क राहण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT