Pune Porsche Car Accident Latest Update:  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Essay Competition: माझा बाप बिल्डर असता तर? पुण्यात भव्य निबंध स्पर्धा, विषय, ठिकाण अन् नियम सर्वच हटके; अनोख्या निषेधाची राज्यात चर्चा

Gangappa Pujari

पुणे, ता. २६ मे २०२४

पुणे शहरात बिल्डर पुत्राने दोघांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या अपघातानंतर बड्या बिल्डरच्या लेकाला पाठीशी घालण्याचेही प्रकार समोर आले. याविरोधात पुण्यातील काँग्रेस नेत्यांनी जोरदार आवाज उठवत राज्य सरकारसह पुणे पोलिसांना घेरले. त्यानंतर आज या घटनेचा निषेध म्हणून पुण्यातील काँग्रेसकडून भव्य निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी विशाल अग्रवाल नावाच्या शहरातील प्रसिद्ध उद्योगपतीसह त्याच्या अल्पवयीन मुलावर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुलाला जामीन देताना पोलिसांनी ३०० शब्दांचा निबंध लिहण्याची शिक्षा दिली होती. यावरुनच सर्वत्र संतापाची लाट उसळली असून अपघाताच्या निषेधार्थ पुणे काँग्रेसने भव्य निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. या निबंध स्पर्धेची राज्यभरात चर्चा असून स्पर्धेचे विषय सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

काय आहेत निबंध स्पर्धेचे विषय?

१. माझी आवडती कार (पोर्शे, फरारी मर्सिडिज की इतर)

२. दारुचे दुष्परिणाम

. माझा बाप बिल्डर असता तर?

४. मी खरच पोलीस अधिकारी झालो तर?

५. अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण?

नियम अन् ठिकाणही हटके

आज अपघातस्थळी म्हणजेच कल्याणीनगर परिसरातील बॉलर पबसमोर ही स्पर्धा सुरू झाली असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्थ ठेवण्यात आला आहे. ३०० शब्दात हा निबंध लिहायचा असून १७ वर्ष ८ महिने ते ५८ वर्षांपर्यंतची वयोमर्यादा आहे. दरम्यान, या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असून पुणे काँग्रेसचे आमदार, लोकसभेचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण केले जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT