पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवाल आणि डॉ. अजय तावरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. या दोघांचा विशाल अग्रवाल आणि डॉ. अजय तावरे यांच्याशी काही तरी संबंध असल्याचे म्हटले जात आहे. आज या तिघांच्या जामीन अर्जावर कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयामध्ये बदलण्यात आले होते. याप्रकरणात आरोपी मुलाचे आई-वडील आणि ससूनचे डॉक्टर अजय तावरे यांना अटक करण्यात आली होती. हे सर्वजण सध्या येरवडा कारागृहात आहेत. आता त्यांचा येरवडा कारागृहातील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी दोघांना अटक केली आहे. या दोघांचा देखील ससून रुग्णालयातील रक्ताचे नमुने फेरफार प्रकरणात संबंध असल्याचे बोलले जात आहे. अल्पवयीन आरोपी तरुणासोबत असलेल्या मित्रांचे रक्ताचे नमुने या आरोपींनी बदलले होते.
पुणे गुन्हे शाखेने अटक केलेल्या दोन्ही आरोपींचा अग्रवाल कुटुंबीयांशी काही संबंध आहे की नाही या बाजूने पुणे पोलिस तपास करणार आहेत. आरोपी तरुणासोबत असलेल्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलणाऱ्या दोघांचा डॉक्टर अजय तावरेशी देखील काही संबंध आहे का? या बाजूने पोलिस तपास करणार आहे. अशामध्ये आज आरोपी अजय तावरे, विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. कोर्ट नेमका काय निर्णय देतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.