Shivani Agrawal  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Porsche Car Accident: ब्लड रिपोर्ट फेरफार, आता चौकशीचा फेरा!, अल्पवयीन मुलाच्या आईच्या अडचणी वाढल्या

Sossoon Hospital Blood Report Tampering Case: पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणात आता त्याची आई शिवानी अग्रवालची चौकशी होणार आहे. त्यामुळे आरोपी मुलाच्या आईच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील (Pune Porsche Car Accident) आरोपी मुलाच्या आजोबा आणि वडिलांनंतर आता त्याच्या आईच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार प्रकरणामध्ये आता आरोपीची आई आणि विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांची पत्नी शिवानी अग्रवाल यांची चौकशी होणार आहे. शिवानी अग्रवाल (Shivani Agarwal) या सध्या संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून शिवानी अग्रवाल यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.

कार अपघातातील अल्पवयीन आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ससून रुग्णालयाचे दोन डॉक्टर आणि एका शिपायाला अटक केली आहे. या तिघांची देखील पोलिसांकडून कडून चौकशी सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलऐवजी एका महिलेचे रक्त घेण्यात आले होते. ससून रुग्णालयामध्ये बदलण्यात आलेले रक्त एका महिलेचे असल्याची माहिती चौकशी समितीच्या अहवालातून उघड झाली असल्याचे सुत्रांनी सांगितली. ससूनमध्ये घेण्यात आलेले आरोपीच्या रक्ताऐवजी त्याच्या आईचे रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आता आरोपी मुलाच्या आईची पुणे पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

या ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात डॉ. अजय तावरे, श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्याविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यातील सेक्शन नव्याने वाढवले आहे. त्यामुळे या तिघांच्याही अडचणीमध्ये वाढ होणार आहे. ⁠ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी घेतलेले पैसे म्हणजे लाच असल्याचा पुणे पोलिसांचा आरोप आहे. ⁠हे सेक्शन लावल्याने आता ओरीपींचे न्यायालय बदलले. आता जेएमएफसी ऐवजी एसीबीसाठीच्या विशेष न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. या तिन्ही आरोपींची पोलिस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशामध्ये पुणे पोलिस आरोपींची पोलिस कोठडी वाढवून मागणार असल्याचे म्हटले जात आहे. ⁠

दरम्यान, ससून रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यानंतर डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी ससून रुग्णालच्या डीन पदाचा कार्यभार हाती घेतला. अतिरिक्त कार्यभार स्वीकारणारे डीन डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना घेऊन पाहणी केली. ससून रुग्णालयातील सर्व विभाग प्रमुखांची त्यांनी आज तातडीची बैठक घेतली. यापुढे अशा गोष्टी घडणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ अशी ग्वाही यावेळी चंद्रकांत म्हस्के यांनी दिली. ससून रुग्णालयामधील फॉरेन्सिक लॅबची देखील डॉ.चंद्रकांत म्हस्के यांनी पाहणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Itchy ears after bathing: आंघोळीनंतर तुमच्याही कानात सतत खाज येते? दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांनी सांगितलं कारण

Home Cleaning Tips: दिवाळीसाठी घराची साफसफाई करायची आहे? मग, वेळ आणि मेहनत वाचवणाऱ्या ७ सोप्या टिप्स नकी फॉलो करा

३-४ महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, गणेश नाईकांच्या विधानाचा नेमका अर्थ काय?

Smartphone Tips : मोबाईल अपडेट केल्यानंतरही रीस्टार्ट का करावे? जाणून घ्या महत्त्वाचे फायदे

SCROLL FOR NEXT