Pune Porsche Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Porsche Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण; शिवानी अग्रवालला रक्त बदलण्याचा सल्ला कोणी दिला? धक्कादायक माहिती समोर

Blood Report Exchanege Update: पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याप्रकरणी रक्त बदलण्याचा सल्ला आरोपीच्या आईला मकानदारने दिला होता.

Rohini Gudaghe

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी पुन्हा एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मकानदार आणि डॉ. तावरे यांनीच रक्त बदलण्याचा सल्ला दिला होता, हे आता पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. मकानदार आणि डॉ. तावरे यांनीच अल्पवयीन मुलाऐवजी आईचे रक्त बदलण्यास सांगितल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणी ही मोठी अपडेट समोर आली आहेत.

विशाल अग्रवाल आणि मकानदारची एका कॅफेत भेट झाली होती. तुमच्यावर कारवाई होईल, असा इशारा मकानदारने विशाल अग्रवाल यांना दिला होता. या भेटीनंतर विशाल अग्रवाल हे संभाजीनगर येथे फरार झाले (Pune Porsche Accident) होते. ससून रूग्णालयामध्ये रक्ताचे नमुने बदलण्यात अश्फाक मकानदारचा हात असल्याचं समोर आलं आहे, पोलीस तपासात तसं निष्पन्न झालं आहे. ससून रूग्णालयातील डॉ. तावरे अन मकानदारचे पाच महिन्यात ७० फोन झाल्याचं समोर आलं आहेत.

अश्फाक मकानदारने पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल करण्यासाठी आरोपीच्या आईला मदत केली आहे. त्याला १० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली (Blood Report Exchanege Update) होती. धक्कादायक बाब म्हणजे, रक्त बदलण्याचा सल्लाच मकानदारने शिवानी अग्रवालला दिल्याचं पोलीस तपासात समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणी रोज धक्कादायक खुलासे होत आहेत.

पुण्यामध्ये १८ मे रोजी रात्री एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगातील आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडलं होतं. त्यानंतर हा मुलगा विशाल अग्रवालचा असल्याचं समोर आलं होतं. त्याला वाचवण्यासाठी विशाल अन् शिवानी अग्रवालने (Shivani Agarwal) त्याचे ब्लड रिपोर्ट बदलले होते. परंतु याचा पर्दाफाश झाला. पण ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी मास्टर माईंड कोण याचा पोलीस शोध घेत होते, तेव्हा मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अल्पवयीन तरुणासोबत पार्टीमध्ये असलेल्या ८ ते १० मित्रांची पोलिसांनी चौकशी केली आहे. कोझी आणि ब्लॅक पबमध्ये पार्टी केलेल्या सगळ्या मित्रांचे पोलिसांनी जबाब नोंदवले (Pune News) आहेत. पार्टीमध्ये नेमकं काय झालं? पार्टी कोणी ठेवली होती? कोण कोण याठिकाणी होतं, असे अनेक प्रश्न विचारले गेले आहेत. याआधी अपघात झालेल्या गाडीतील मित्रांची पोलिसांनी कसून चौकशी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Maharashtra News Live Updates: अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

SCROLL FOR NEXT