Pune Accident Case Latest Update Saam TV
मुंबई/पुणे

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट बदला, पुण्यातील डॉक्टरांना बड्या व्यक्तीचा फोन? कारनामा उघड!

Pune Accident Case Latest Update : पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहे. अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडल्या? हे आता हळूहळू समोर येत आहे.

Satish Daud

पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहे. अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडल्या? हे आता हळूहळू समोर येत आहे. नुकतेच पुणे पोलिसांनी या प्रकरणात ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली. अजय तावरे आणि श्रीहरी हरलोर, अशी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत.

या डॉक्टरांवर अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. सध्या दोन्ही डॉक्टरांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, अपघात झाल्यानंतर काही वेळातच डॉ. अजय तावरे याला एका आमदाराचा फोन आला होता, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

या आमदाराने डॉ. तावरेला फोन करून नेमकं काय सांगितलं? त्यांच्यात काय चर्चा झाली? पोलिसांनी जेव्हा अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल ससून रुग्णालयात पाठवले होते, तेव्हा रिपोर्ट बदलण्यासाठी आमदारानेच शिफारस केली होती का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. तावरेला फोन करणारा हा आमदार कोण? असा प्रश्नही पुणेकर विचारत आहेत.

डॉ. अजय तावरे हा ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅबचा एचओडी आहे. तर डॉ. श्रीहरी हरलोर रुग्णालयातील विभागात चीफ मेडिकल ऑफिसर आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात दारूचा अंश येऊ शकतो हे लक्षात आल्यावर रिपोर्ट बदलायचे असं दोघांनी ठरवल्याचं उघड झालं आहे.

यासाठी डॉक्टरांनी दुसऱ्याच एका रुग्णाचे रक्ताचे नमुने टेस्टिंगसाठी दिले होते. तर अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले होते, असंही उघड झालं आहे. दरम्यान, ब्लड रिपोर्ट बदलल्या प्रकरणी आता पुणे पोलीस ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत. तपासात नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

SCROLL FOR NEXT