Mumbai High Court On Pune Porsche Car Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Porsche Car Accident: पुणे अपघातातील आरोपीचा बाल सुधारगृहातील मुक्काम वाढला, जामीन याचिका हायकोर्टाने फेटाळली

Bombay High Court On Pune Porsche Car Accident: पुणे कल्याणीनगर कार अपघातातील आरोपी मुलाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आरोपीची जामीन याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळाली आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident Case) मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणातील आरोपी मुलाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आरोपी मुलाचा बाल सुधारगृहातील मुक्काम वाढला आहे. आरोपीला जामीन मिळावा यासाठी त्याच्या नातेवाईकांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पण ही याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आता या मुलाला बाल सुधारगृहामध्येच राहावे लागणार आहे. या अपघात प्रकरणातील आरोपी मुलाचे आई-वडील हे देखील तुरुंगात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या जामीनासंदर्भातील याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. आरोपी मुलाला बाल निरीक्षण गृहातून सोडण्यात यावे अशी याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती. आरोपी मुलाच्या काकूने ही याचिका दाखल केली होती. बाल अधिनियम कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप आरोपी मुलाच्या नातेवाईकांनी केला होता. पण त्यांनी दाखल केलेली ही याचिका हायकोर्टाने फेटाळली त्यामुळे आरोपी मुलाचा बाल सुधारगृहातील मुक्काम आणखी वाढला आहे.

पुण्याच्या कल्याणीनगर भागामध्ये 19 मे रोजी मध्यरात्री ही अपघाताची घटना घडली होती. आरोपी मुलाने आपल्या आलिशान पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना चिरडले होतो. कार चालवाताना आरोपी मुलगा मद्यधुंद अवस्थेत होता. या अपघातामध्ये अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. हे दोघेही मूळचे मध्य प्रदेशचे होते आणि पुण्यामध्ये ते नोकरी करत होते. दोघेही इंजिनिअर होते. अनिस आणि अश्विनी आपल्या मित्राची बर्थडे पार्टी करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणावरून ते दुचाकीवरून येरवड्याच्या दिशेला जात असताना त्यांना पोर्शे कारने जोरदार धडक दिली होती. यामध्ये दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता.

दरम्यान, पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो बाल सुधारगृहामध्ये आहे. आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना देखील याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याचसोबत ससून रुग्णालयाचे डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरनोळ, शिपायी अतुल घटकांबळे, मुंबईतून अटक करण्यात आलेला अश्फाक मकानदार आणि आणखी एकाला देखील याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडून सुरू आहे. सध्या आरोपी मुलाचे आई-वडील आणि अश्फाक मकानदार हे येरवडा कारागृहात आहेत. तर इतर सर्व आरोपी पोलिस कोठडीमध्ये आहेत. अल्पवयीन आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणात या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nalasopara: गटारावरील लोखंडी जाळीत महिलेचा पाय अडकला, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल; VIDEO

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT