Pune Porsche Case Saam tv
मुंबई/पुणे

Pune Porsche Case : पुणे पोर्शे अपघात प्रकरण; आरोपीच्या आजोबाला ४ दिवसांची पोलीस कोठडी

Pune Porsche Case update : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात कोर्टाने सुरेंद्र अग्रवालला ४ दिवसांची कोठडी दिली. त्यामुळे मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवालला २८ मे पर्यंत कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

Vishal Gangurde

पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल याच्या विरोधात तिसऱ्यांदा एफआयर नोंदविण्यात आला आहे. सुरेंद्र अग्रवालला शनिवारी सकाळी अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कोर्टात हजर केल्यानंतर ७ दिवसांची कोठडी मागितली. त्यानंतर कोर्टाने सुरेंद्र अग्रवालला ४ दिवसांची कोठडी दिली. त्यामुळे सुरेंद्र अग्रवालला २८ मे पर्यंत कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी कोर्टात सांगितलं की, आरोपी मुलाच्या आजोबाने चालक गंगारामला गुन्ह्याची जबाबदारी घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तसेच चालकाला बंगल्यात कैद केलं. घरातील काही सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळत आहे.

सुरेंद्र अग्रवालने कोर्टात सांगितलं की, अपघात झाला, त्यावेळी मी पुण्यात नव्हतो. मी वैयक्तिक कामानिमित्त दिल्लीला गेलो होतो. माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. पोलीस घरी येऊन डीव्हीआर घेऊन गेले आहेत'.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आजोबा अग्रवालचं नाव घेतं म्हटलं की, सुरेंद्र अग्रवालने चालकाला गुन्हाची जबाबदारी घेण्यासाठी दबाव टाकला. त्याने चालक गाडी चालवत असल्याचं म्हटलं होतं. मात्र, पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर सिद्ध झालं की, अल्पवयीन मुलगा गाडी चालवत होता'.

'आजोबाने चालकाला पैसे आणि गिफ्ट देण्याचं आमिष दिलं. त्यानंतर चालक गंगारामने येरवडा पोलीस स्टेशनमध्ये अपघातावेळी गाडी चालवत असल्याचं सांगितलं. आरोपी सुरेंद्रने चालकाचा मोबाईल घेऊन घरात बंदिस्त केलं. चालकाच्या पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बंगल्यावर जाऊन सुटका केली. चालक आणि त्याच्या कुटुंबाला पोलिसांकडून सुरक्षा देण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Epstein Files: 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' लवकरच उघडणार, सेटवरून पहिला फोटो समोर; भोंदू खरातच्या भूमिकेत कोण?

Smart Meter : महाराष्ट्रात स्मार्ट मीटरचा धडाका; तब्बल १.५ कोटींहून अधिक ग्राहकांकडे स्थापना, पाहा A टू Z माहिती

Painkiller Side Effects : अंगदुखी असो वा ताप; वारंवार पेनकिलर खाताय? वेळीच थांबा! अन्यथा जीवावर बेतू शकतं

Maharashtra News Live Update : बारामतीतील उजनी धरणात पंचवीस टक्के पाणीसाठा वजा

Uterine infection: गर्भाशयात इन्फेक्शन झाल्यावर कोणती लक्षणं दिसतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला कधी घ्याल

SCROLL FOR NEXT