Sassoon Hospital Pune Saam TV
मुंबई/पुणे

Pune Porsche Accident Update: ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी मोठी अपडेट; डॉक्टरांनी घेतलेले रक्ताचे नमुने दुसऱ्याच महिलेचे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाच्या आईच्या रक्ताचे नमुने न घेता दुसऱ्याचं आईचे नमुने घेतल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. तसेच चाचणीसाठी रक्त घेताना सीसीटीव्ही नसेल त्याच ठिकाणी रक्ताचे नमुने घेण्यात आल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिलीय.

सर्वत्र चर्चेत आलेल्या पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात नव-नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात रुग्णालयातील डॉक्टरांसह राजकीय नेत्यांची नावे समोर येत आहेत. या प्रकरणात राजकीय नेत्याचा हस्तक्षेप असल्याचं समोर येत आहे. याचदरम्यान डॉक्टरांनी घेतलेले अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या आईच्या रक्ताच्या नमुन्याबाबत धक्कादायक बाब समोर आलीय. डॉक्टरांनी घेतलेले रक्ताचे नमुने हे अल्पवयीन मुलाच्या आईचे नसून ते दुसऱ्याच महिलेचे असल्याची समोर आलंय.

ज्यावेळी रक्ताचे नमुने घेण्यात आले, त्यावेळी अल्पवयीन मुलाची आई-वडील हे दोघेही त्या ठिकाणी उपस्थित होते. रक्त नमुने घेताना विधि संघर्ष बालकाबरोबर अजून तीन मित्र उपस्थित होते. त्यांच्याबरोबर एक ड्रायव्हर उपस्थित होता. या सर्वांचेच रक्ताचे नमुने घेण्यात आले. परंतु रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, तेव्हा तेथे दुसऱ्या महिलेच्या रक्ताचे नमुने होते, अशी बाब समोर आलीय.

अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे नमुने सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी घेण्यात आल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिलीय. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने हे सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या ठिकाणी घेण्यात आल्याची माहिती या गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिलीय. रक्ताचे नमुने घेतलेल्या ठिकाणाचा पंचनामा देखील करण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.

ज्या ठिकाणी मुलाचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहे, त्याच्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये डॉ. श्रीहरी हाळनोर आणि घटकांबळे यांच्यासह काही साक्षीदार दिसून आलेत. डॉ. तावरे, डॉ. हाळनोर आणि घटकांबळे त्यांच्यामध्ये रक्ताचे नमुने घेण्याच्या वेळी विविध माध्यमांमधून संवाद झाला. तसा सीडीआर देखील जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT