Vasant More Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Politics : मनसेच्या वसंत मोरेंच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळं पुण्यातलं राजकारण ढवळलं, कुणासाठी काहीही करा, पण...

Vasant More : शर्मिला ठाकरे यांनी एका कार्यक्रमात खासदारकीविषयी केलेल्या विधानावर वसंत मोरे नाराज झाल्याचं म्हटलं जातंय. काल शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर हे खासदारकीचे उमेदवार असतील असे संकेत एका कार्यक्रमात दिले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(सचिन जाधव, पुणे)

MNS Leader Vasant More WhatsApp Status:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे आपल्या काम आणि अ‍ॅक्शनमुळे नेहमी चर्चेत असतात. वसंत मोरे आता आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्समुळे चर्चेत आलेत. वसंत मोरे आपल्या पक्षाच्या निर्णयावर नाराज असल्याचा अंदाज लावला जात आहे. मोरे यांचे स्टेट्स हे पक्षनेत्या शर्मिला ठाकरे यांना लक्ष्य करणारी असल्याचं म्हटलं जात आहे. (Latest News)

पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही नेते उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत.याची प्रचिती वसंत मोरेंच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सवरून आलीय. दरम्यान शर्मिला ठाकरे यांनी एका कार्यक्रमात खासदारकीविषयी केलेल्या विधानावर वसंत मोरे नाराज झाल्याचं म्हटलं जातंय. काल शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर हे खासदारकीचे उमेदवार असतील, असे संकेत एका कार्यक्रमात दिले होते.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शर्मिला ठाकरे यांच्या विधानामुळे वसंत मोरे नाराज झाले असून त्यांनी त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स "कुणासाठी किती ही करा वेळ आली की फणा काढतातच" असं ठेवलं. त्यामुळे हे स्टेट्स शर्मिला ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे ठेवलं असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी वसंतला मला दिल्लीला पहायचं, असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटले होते. पण शर्मिला ठाकरे साईनाथ बाबर यांच्या कार्यक्रमांमध्ये साईनाथ दिल्लीला गेला तर दुधात साखर पडेल अशा प्रकारचे वक्तव्य केलं.

या वक्तव्यानंतर वसंत मोरेंनी ठेवलाय सूचक व्हाट्सअप स्टेटस ठेवलंय."कुणासाठी कितीबी करा वेळ आली की फणा काढतातच पण मी बी पक्का गारुडी आहे योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार" असं स्टेट्स मोरेंनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर ठेवले आहे. दरम्यान मनसेच्या दोन्ही नेत्यांना खासदारकी लढवायची असून उमेदवारी मिळावी, यासाठी दोन्ही नेते आग्रही आहेत. पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT