Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune : नायजेरियन पती-पत्नीकडून कोट्यावधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime News : नायजेरियन पुरुषाचे नाव उगुचुकु इम्यन्युअल तर त्याच्या पत्नीचे नाव ऐनीबेली ओमामा व्हीआन असे आहे. ते दोघेही बाणेरमध्ये राह होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव

पुणे: पुणे पोलिसांच्या (Pune) अंमली पदार्थविरुद्ध पथकाने नायजेरियन पती-पत्नीकडून कोट्यावधी रुपयांचे अमली पदार्थ (एमडी, कोकीन) जप्त केले आहेत. पुण्यातल्या नालंदा गार्डन, बाणेर या ठिकाणी एक नायजेरियन पती-पत्नी राहत असून ते राहत्या घरातून कोकीन, एमडी असे अंमली पदार्थ (Drugs) मोठ्या प्रमाणात विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत या नायजेरियन पती-पत्नीला ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार या नायजेरियन पुरुषाचे नाव उगुचुकु इम्यन्युअल तर त्याच्या पत्नीचे नाव ऐनीबेली ओमामा व्हीआन असे आहे. दोघेही मूळचे नायजेरियन आहेत, मात्र सध्या ते दोघेही बाणेरमध्ये राहत आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी यो दोघा पती-पत्नीला अटक केली आहे. त्याच्याकडून बेकायेशीररित्या विकण्यासाठी आणलेल्या ६४४ ग्रॅम एमडी, २०१ ग्रॅम कोकेन, मोबाईल, इलेक्ट्रिक वजन काटा, प्लास्टिक पिशव्या आणि डबा असे सर्व मिळून सुमारे १ कोटी ३१ लाख ८ हजारांचे अंमली पदार्थ आणि त्यासाठीचे इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी एनडीपीसी ॲक्टनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT