pune crime Saam tv
मुंबई/पुणे

जीवाशी खेळ! पुण्यात बनावट गुटख्याचा कारखाना; पोलिसांकडून कारवाईत १ कोटींचा मुद्देमाल जप्त

pune crime news : लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी बनावट गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त केला.

Akshay Badve

लोणी काळभोरमध्ये पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केलीये.

पोलिसांकडून एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांकडून लोणी काळभोरमध्ये बनावट गुटखा उद्ध्वस्त केलाय.

पुणे : पुण्यात बनावट गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी कारवाईत तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुण्यातील लोणी काळभोर परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-२ च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बनावट गुटखा तयार करण्याच्या कारखान्यावर छापा टाकून कारवाई केली.

पुण्यातील थेऊर फाटा येथील कांबळेवस्ती भागातील एका गोदामावर छापा टाकत ही कारवाई केली. पोलिसांनी गोदामावर छापा कारवाई करून बनावट आर.एम.डी. गुटख्याची सुंगधी तुंबाखू, विमल गुटखा पान मसाला, गोदामाच्या बाजूस शेतामध्ये बनावट गुटखा तंबाखू तयार करण्याठी लागणारा कच्चामाल जप्त केला.

बनावट सुपारी, सुंगधी तंबाखू, थंडक, केमिकल, गुलाबपाणी, प्रिंटेड पाऊच, बॉक्स आणि पोती असा एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बनावट गुटखा तयार करणाऱ्या कंपनीचा मालक रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता, कामगार रामप्रसाद ऊर्फ बापू बसंता प्रजापती, अप्पू सुशील सोनकर, दानिश मुसाकीन खान यांना ताब्यात घेतलं आहे.

बीडमध्ये बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून लाखो लुटले

बीडच्या गेवराई तालुक्यातील गढी नजीक रोडवर चोरी झाल्याची घटना मध्यरात्री घडली. तेलंगणा राज्यातील काही महिला प्रवासी राष्ट्रीय महामार्ग 52 वरुन प्रवास करत होते. त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत गाडीतील महिलांच्या दागिन्यांसह मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा केला. त्याचबरोबर लाखो रुपये लुटले, या प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : "मी ब्रेक घेतोय..."; मराठमोळ्या अभिनेत्याचा मोठा निर्णय, कारण वाचून धक्का बसेल

Maharashtra News Live Update: लाखोंच्या अनुदान अपहारप्रकरणी महिला तलाठी जेरबंद

South Indian banana chips: चहासोबत काहीतरी मस्त हवंय? घरच्या घरी बनवा साऊथ स्टाईल कुरकुरीत बनाना चिप्स

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेची नवीन नोंदणी अन् e-KYC सुरू? 'या' व्हायरल मेसेजमागचं धक्कादायक सत्य आलं समोर

Political News : दिल्लीत हालचालींना वेग! मोदींच्या कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होणार, 'या' नेत्यांना मिळणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT