Pune Police  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Police: वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या, पुणे पोलिस दलात खळबळ

Pune Police Officer End life: पुण्यामध्ये पोलिस अधिकाऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केली. डोक्यात गोळी झाडून त्यांनी आयुष्य संपवलं. या घटनेमुळे पुणे पोलिस दलात खळबळ उडाली.

Priya More
  • पुण्यामध्ये पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या

  • राहत्या घरात डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवलं

  • निलेश पाटील असं आत्महत्या केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे

  • पोलिस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे पोलिस दलात खळबळ

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये पोलिस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाने टोकाचे पाऊल उचललं. राहत्या घरी त्यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकाऱ्याने आत्महत्या का केली यामागचे कारण समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश भाऊसाहेब पाटील असे आत्महत्या केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पुण्यातील औंध परिसरात ते वास्तव्यास होते. त्यांनी आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास आत्महत्या केली. राहत्या घरात त्यांनी डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवलं. गोळीबाराचा आवाज ऐकून आसपासचा परिसर हादरला. घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी निलेश पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. निलेश पाटील हे गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते. या आजाराच्या नैराश्यातून त्यांनी आज त्यांच्या राहत्या घरी सर्विस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

निलेश पाटील हे यापूर्वी विश्रामबाग पोलिस ठाण्यासह पुणे शहरातील इतर प्रमुख पोलिस ठाण्यात कार्यरत होते. निलेश पाटील यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. त्यांनी आत्महत्या केल्यामुळे पाटील कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेने पुणे शहर पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies For Frequent Urination: वारंवार लघवी आल्याचा भास होतोय? लघवीची जळजळ कमी करण्यासाठी करा काकडीचा सोपा उपाय

IAS Transfer: 42 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

Health Tips - सकाळी उठल्याबरोबर किंवा जेवणानंतर लगेच चहा पिताय? तुमच्या या सवयी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात

Maharashtra News Live Update: दिल्लीत CM फडणवीसांनी घेतली अमित शाहांची भेट

प्रत्येक एफआयर माझ्यासाठी एक पदक! राहुल गांधी खासदारांसोबत जंतर-मंतरकडे रवाना| Video

SCROLL FOR NEXT