Pune News x
मुंबई/पुणे

Pune : पुण्यातील शाळा, विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी, पोलिसांकडून महत्त्वाचं पाऊल

Pune News : पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर देण्यात आला आहे.

Yash Shirke

पुणे पोलिसांकडून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. आता पुण्यातील प्रत्येक शाळेच्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय शाळेच्या बसमध्ये महिला अटेंडंट असणे देखील अनिवार्ण राहणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने हे नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण उपसंचालक यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले काही निर्णय घेण्यात आले. आता प्रत्येक शाळेच्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधा असणे आवश्यक असणार आहे.

शाळेच्या बसमध्ये सहा आणि त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांना ने-आण करण्याकरीता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. बसमधील वाहनचालक, कंडक्टर, क्लीनर अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यापूर्वी पोलीस पडताळणी करुन घेण्याचे आदेश पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

नियमांचे उल्लघंन केल्याचे आढळलेल्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी असे आदेश देखील देण्यात आले आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाद्वारे १ जानेवारी ते ३१ मे २०२५ दरम्यान १ हजार ३२१ स्कूल बस तसेच ६५० इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. यातील ४१४ स्कूल बस व २०८ इतर वाहने दोषी आढळली असून या कारवाईत नियमांच्या उल्लंघनाबद्दल ५५ कोटी २३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री सरकारी रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बाळांचा होरपळून मृत्यू, ६ गंभीर, ३६ चिमुकल्यांना वाचवले

Medicine Storage Tips : घरात 'या' ७ ठिकाणी कधीच गोळ्या-औषधं ठेवू नका! कारण जाणून घ्या

Monday Horoscope : शंकराची कृपा राहील! 5 राशींची भरभराट होणार, पैसा खर्च करताना काळजी घ्या; वाचा सोमवारचे राशीभविष्य

'शाळांची स्थिती सुधारा, सुविधा द्या! CJP च्या पोलखोलनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली शालेय शिक्षणमंत्री भुसेंची क्लास

कॅबिनेट मंत्र्याच्या ताफ्याचा भीषण अपघात; एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT