Pahalgam terror attack security impact  Saam TV news
मुंबई/पुणे

Lodge Rules : गुपचूप लॉजवर जाताय? सतर्क राहा, पुणे पोलिसांच्या लॉज मालकांना ४ महत्त्वाच्या सूचना

Pahalgam terror attack security impact : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी लॉज मालकांसोबत बैठक घेऊन सर्व ग्राहकांची कागदपत्रे तपासण्यास सांगितले असून सीसीटीव्ही सुरक्षेची सूचना दिली आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

Pune police guidelines to lodge owners : पुण्यातील लॉजचे मालक आणि चालक यांना पुणे पोलिसांनी चार महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. लॉज येथे रहावयास येणारे सर्व ग्राहकांची कागदपत्रे व्यवस्थितपणे तपासून रजिस्टरमध्ये नोंद करा अशी महत्त्वाची सूचना पोलिसांनी लॉजचे मालक- चालक यांना केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील लॉजचे मालक- चालक यांची बैठक घेण्यात आली.

पुणे पोलिसांच्या परिमंडळ ५ कडून हद्दीतील लॉज मालक आणि अधिकारी यांची बैठक झाली. लॉजवर राहावयास येणारे परदेशीय नागरिक यांचे सी फॉर्म भरून त्यांचे पासपोर्ट व व्हिजा यांच्या छायांकित प्रति घेऊन रजिस्टरला नोंद करावी अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. लॉजचे प्रवेशद्वारावर व सभोवती येणारे जाणारे रस्ते कव्हर होतील अशा पद्धतीने एचडी व नाईट विजन कॅमेरे बसवण्यात यावेत अशा सुद्धा सूचना पोलिसांनी दिल्या. लॉज मध्ये संशयित इसम आढळून आल्यास तात्काळ पोलीस कंट्रोल रुमला कळवा, असेही पोलिसांनी सांगितलेय.

पुणे पोलिसांच्या परिमंडळ 500 पोलीस उपयुक्त राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात या अंतर्गत येणाऱ्या सर्व लॉज च्या मालक आणि चालक यांच्यासोबत काल आम्ही बैठक घेतली. या बैठकीत आम्ही त्यांना काही मार्गदर्शक सूचना जर त्यांनी पाळणा बंधनकारक आहे याबाबत माहिती दिली. त्यांच्या लॉज मध्ये येणारे सर्व नागरिकांची कागदपत्र तपासूनच त्यांना प्रवेश द्यावा तसेच परदेशी नागरिकांच्या प्रवेशाबद्दल सुद्धा त्यांचे सर्व कागदपत्र आणि पासपोर्ट सोबत असलेला विजा याची पडताळणी करून घेतल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जाईल याची खात्री करावी."

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर केंद्र सरकार ने पाकिस्तानी नागरिकांचे सर्व शॉर्ट टर्म विजा रद्द केले होते. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील तीन पाकिस्तानी नागरिकत्व असणाऱ्यांना आता परत पाठवण्यात आला आहे. हे तिन्ही पाकिस्तानी नागरिक पुण्यातील कोंढवा परिसरात काही दिवसांपासून वास्तव्यास होते. यातील एक जण हा त्याच्या नातेवाईकाकडे राहण्यासाठी आला होता असल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT