अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी
Pune Police Latest News : जमिनीच्या वादात आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी पुण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. वाघोलीत १० एकर जमीन प्रकरणात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. चंदननगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लांडगे यांच्यासह चार जणांच्या विरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील वाघोली येथील 10 एकर जमिन हडपण्याचे उद्देशाने संगनमत करून फौजदारीपात्र रचून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता बनावट महिला उभी करून ती मूळ जमिनीची मालक असल्याच्या भासविण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यवसायाशी देखील हे प्रकरण संबंधित असल्याचे बोलले जाते आहे. आनंद लालासाहेब भगत, शैलेश सदाशिव ठोंबरे, राजेंद्र लांडगे, अपर्णा यशपाल वर्मा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चंदननगर पोलिसांचे एक तपास पथक आता या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत आहे. या प्रकरणात वरीष्ठ पोलिसाचा संबंध आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी तपास पथक स्थापन केले असून, गुन्ह्याच्या मुळाशी जाण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे. बनावट कागदपत्रे, संगनमत आणि आर्थिक व्यवहार यांचा तपास करण्यावर पोलिसांचा भर आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा अशा प्रकरणात सहभाग असल्याने पुणे पोलिस दलाची प्रतिमा डागाळल्याची चर्चा आहे. नागरिकांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणात पारदर्शक तपासाचे आश्वासन दिले आहे, तर लांडगे आणि इतर आरोपींवरील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.