Pune PFI News Saam TV
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात PFI च्या 60 ते 70 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

साम टिव्ही ब्युरो

Pune Crime News : बेकायदेशीर जमाव जमावल्याच्या आरोपावरून पुण्यात (Pune) पीएफआयच्या (PFI) 60 ते 70 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय 26, रा. शिवनेरी नगर कोंढवा) यांच्यासह 60 ते 70 इसमांवर गुन्हा (Police) दाखल करण्यात आला आहे. सीआरपीसी 41/1 नुसार या सर्वांना नोटीस बजावण्यात आली आहे. (Pune News Today)

देश विघातक कृत्य केल्याच्या संशयावरून केंद्रीय तपास यंत्रणेने पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या देशभरातील कार्यालयावर गुरुवारी धाडसत्र राबवले. यामध्ये शंभरहून अधिक जणांना एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातही याप्रकरणी छापा टाकण्यात आला होता. या ठिकाणाहून दोघांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा निश्चित करण्यासाठी पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. याप्रकरणी आता बेकायदेशीर जमाव जमवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Latest News Today)

पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये रिजाज जैनुद्दीन सय्यद यांच्यासह 60 ते 70 कार्यकर्त्यांचा समावेश आहे. सीआरपीसी 41/1 नुसार या सर्वांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugarcane Juice Benefits: उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे फायदे काय आहेत?

Maharashtra Live News Update: येरवडा कारागृहातील कैद्यांकडे सापडला मोबाईल,सिमकार्ड,पॉवर बँक,चार्जर आणि वायर

पुण्यातील बिल्डरकडून फसवणूक; सेवानिवृत्त अधिकाऱ्याने इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवलं

Shrikant Shinde: लोकसभेत खास 'फ्रेंडशिप ग्रुप', श्रीकांत शिंदेंची तरुण सदस्य म्हणून एन्ट्री, नेमकं मिशन काय असणार?

Spruha Joshi: रुपसुंदरा, हिरव्या साडीत खुललं स्पृहा सौंदर्य, फोटो पाहून वेडे व्हाल

SCROLL FOR NEXT