Pune Police Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune : गुंड गजा मारणे रडारवर, अख्ख्या टोळीवर मकोका लावणार, संपत्तीची चौकशीही होणार; पोलीस आयुक्तांचा इशारा

Gaja Marne gang assets seized Crime News: मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला ज्याने मारहाण केली, त्या टोळीचा प्रमुख गजा मारणे याच्यावरही कारवाई होणार आणि मकोका लावण्यात येणार, असं पुणे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं.

Bhagyashree Kamble

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपींची धिडं काढली होती. तसेच ३ आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. तसेच ज्याने मारहाण केली त्या टोळीचा प्रमुख गजा मारणे याच्यावरही कारवाई होणार आणि मकोका लावण्यात येणार, असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलंय. या प्रकरणानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असल्याचं दिसत आहे.

पत्रकार परिषद घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाई विषयी माहिती देताना सांगितलं की, 'या प्रकरणात मारहाण करणाऱ्या तिघांवर कारवाई करत त्यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे. या टोळीला नेस्तनाबूत करण्याची आमची भूमिका आहे. एकूण २७ जण आमच्या रडारवर आहेत', असं अमितेश कुमार म्हणाले.

संपत्ती जप्त

'गजा मारणे टोळीच्या संपुर्ण राज्यातील संपत्तीची माहीती घेण्याचं काम सुरु आहे. संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आरटीओकडुन त्यांच्या वाहनाची माहीती घेतली जात आहे. वाहने जप्त करणार. त्यांच्या बांधकामाची माहीती महापालिकेकडुन घेणार. त्यांची बांधकामे पाडणार, असंही अमितेश कुमार म्हणाले.

सात पिढ्यांना अद्दल घडवू

'आमच्या इथे पोलीस स्टेशनला कोणीही आका, बाका, काका येत नाही. ⁠तुम्ही गुन्हा करु नका. तुम्ही गुन्हा केलात तर, तुमच्या सात पिढ्यांना अद्दल घडेल, अशी कारवाई करू, असा इशाराही अमितेश कुमार यांनी गुंडांना दिला आहे'.

निलेश घायवळ टोळीला इशारा

'पुण्यातील काही गुंड राज्याच्या इतर भागात जाऊन विंड मिल कंपन्यांना त्रास देत आहेत. त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करणार आहोत. आता मी कोणाचे नाव घेऊ इच्छित नाही. पण आम्ही कारवाई करणार असल्याचं अमितेश कुमार म्हणालेत. नाव न घेता त्यांनी निलेश घायवळ टोळीला इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईनंतर पुण्यातही काँग्रेस एकटी, पुण्यात दादांमुळे मविआत बिघाडी

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांची देशी दारू विक्रीच्या ठिकाणी छापेमारी

दुसऱ्या पक्षातून आले, स्वपक्षीयांना खटकलं; गिरीश महाजनांसमोरच भाजप कार्यकर्त्यांचा राडा

Samruddhi Expressway Block: समृद्धी महामार्गावर ३ दिवसाचा ब्लॉक; जाणून घ्या कुठे असेल बंद अन् कुठे असेल सुरू?

संतापजनक! आधी वडील, काका नंतर शेजारच्या आजोबानं १२ वर्षीय मुलीला वासनेचा बळी बनवलं, धक्कादायक कृत्यानं गावच हादरलं

SCROLL FOR NEXT