pune news Saam tv
मुंबई/पुणे

पुणे पोलिसांकडून घुसखोरांवर लगाम; ११ महिन्यात तब्बल १०३ बांगलादेशी ताब्यात

pune police news : पुणे पोलिसांकडून घुसखोरांवर लगाम लावण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांनी ११ महिन्यात तब्बल १०३ बांगलादेशी ताब्यात घेण्यात आलं आहे.

Akshay Badve

पुणे शहरात पोलिसांची मोठी कारवाई

६ बांगलादेशी महिला पोलिसांच्या ताब्यात

या महिला सीमा ओलांडून भारतात आल्याचे निष्पन्न

पुणे शहरातील बुधवार पेठेत फरासखाना आणि खडक पोलिसांनी रविवारी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवून भारतात बेकायदा वास्तव्यास असलेल्या ६ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. या महिला कोणत्याही कागदपत्रांशिवाय छुप्या मार्गाने सीमा ओलांडून भारतात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

कल्पना शेख (३८), राणी शेख (४२), लकी मोंडल (४०), पूजा शेख (२०), रूमा शेख (३०), निशी ढाली (२९) अशी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहेत. या महिलांविरोधात निर्बंध आदेश लागू करण्यात आले असून त्यांना बांग्लादेशात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

फरासखाना पोलिस ठाणे आणि खडक पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त तपास करत २४ मे रोजी मध्यरात्री बुधवार पेठ भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. बुधवार पेठेतील ‘सागर बिल्डिंग’ येथे काही बांगलादेशी महिला बेकायदा राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी पथकाने त्याठिकाणी छापा टाकला असता ६ बांगलादेशी महिला आढळून आल्या. चौकशीदरम्यान, त्यांनी बांगलादेशातून बेकायदा सीमा ओलांडून भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली. या महिला बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसाय करून उदरनिर्वाह करत होत्या. भारतात त्यांना ब्युटी पार्लर, शिवण काम मिळेल असे आमिष दाखवण्यात आले होते.

परिमंडळ १ चे पोलिस उपआयुक्त यांची कामगिरी, ११ महिन्यांत १०३ बांगलादेशी ताब्यात

पुणे शहरात बेकायदेशीर आणि अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा विरोधात पुणे पोलिसांनी कठोर कारवाई करायला सुरुवात केली आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर पुणे पोलिस दलातील परिमंडळ १ चे पोलिस उपआयुक्त कृषीकेश रावले यांच्या नेतृत्वाखाली आजवर अनेक कॉम्बिंग ऑपरेशन बुधवार पेठेत राबवले गेले.

गेल्या ११ महिन्यात १०३ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात त्यांना यश आलं आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई पुण्यातील बुधवार पेठेत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT