मुंबई/पुणे

Pune Police : पुणे पोलीस आयुक्तांचा पुन्हा दणका, कुख्यात गुंडानंतर आता अमली पदार्थ तस्कारांची परेड

Police Commissioner : सलग दुसऱ्या दिवशी पुणे पोलीस आयुक्तालयात गुन्हेगारांना तंबी देण्यात आल्याने सर्वत्र पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नावाची चर्चा सुरू झालीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(अक्षय बडवे, पुणे)

Pune Police Commissioner Amitesh Kumar :

अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अॅक्शनमोडवर काम करत आहेत. गुंडगिरीला लगाम लावण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार गुन्हेगारांना पुन्हा एकदा तंबी दिलीय. पमंगळवारी २६७ कुख्यांत गुंडांची परेड आणि झडती घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी पोलीस आयुक्तालयात आज आणखी गुन्हेगारांना सज्जड दम दिलाय. आज अवैध धंदे व अमली पदार्थ तस्कारांची पोलीस आयुक्त कार्यालयात परेड घेण्यात आली.

सलग दुसऱ्या दिवशी पुणे पोलीस आयुक्तालयात गुन्हेगारांना तंबी देण्यात आल्याने सर्वत्र पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नावाची चर्चा सुरू झालीय. काल पुणे पोलीस आयु्क्तालयातील मोकळ्या जागेवर गुंडांना एका रांगेत उभे करण्यात आले होते. गेल्या काही दिवासांपासून भाईगिरी करणारे आपला व्हिडिओ मोबाईलवर रिल्स करून सोशल मीडियावर टाकत आहेत. त्यावरून पोलिसांनी पुण्यातील गुंडांना तंबी दिलीय.

कुख्यात गुंड गजानन मारणे, निलेश घायवळ यांचे नाव घेऊन, 'क्राईम ब्रान्च काम कसं करतं माहिती ना' असा दम सुद्धा तांबे यांनी उपस्थित गुन्हेगारांना भरला. या भाषणाचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

पोलिसांचा गुन्हेगारांना इशारा

गुन्हेगारीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही. बेकायदेशीर कृत्यात सहभागी व्हायचे नाही, सोशल मीडियावर व्हिडिओ किंवा रील्स टाकायच्या नाहीत. राहण्याचा पत्ता किंवा मोबाईल बदलल्यास तो क्रमांक बदलल्याची माहिती पोलीस ठाण्यात किंवा गुन्हे शाखेच्या युनिटला हजर राहून कळवावी, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT