Pune Police amitesh Kumar  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : पुणे पोलिसांत मोठे फेरबदल होणार; ७०० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या

Pune Police News : एकाच पोलीस ठाण्यात तसेच गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखा आणि पोलिस मुख्यालयात पाच वर्षांपेक्षा अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मागवली आहे.

प्रविण वाकचौरे

अक्षय बडवे

Pune News :

पुणे पोलीस आयु्क्तपदाची जबाबदारी वरिष्ठ अधिकारी अमितेश कुमार यांनी स्वीकारली आहे. पदभार स्वीकारताच अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस दलात फेरबदल करण्याचे काम हाती घेतली आहे. पुणे शहरातील ७०० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या १४ फेब्रुवारीला होणार आहेत.

पाच वर्षांपासून अधिक काळ एकाच पोलीस ठाण्यात आणि विभागात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. यासाठी एकाच पोलीस ठाण्यात तसेच गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखा आणि पोलिस मुख्यालयात पाच वर्षांपेक्षा अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मागवली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येत्या १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी पोलीस कर्मचार्‍यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात येणार आहेत. पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या या संबंधित पोलीस कर्मचार्‍यांना समोर बोलावून त्यांनी मागितलेल्या तीन पर्यायानुसार करण्यात येणार आहे. (Latest News)

पोलिसांचा गुन्हेगारांना इशारा

अमितेश कुमार यांनी पुणयातील गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठीही प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी मंगळवारी पुण्यातील तब्बत २६७ अट्टल गुन्हेगारांची परेड काढण्यात आली. पुणे क्राईम ब्रांन्चमध्ये गुन्हेगारांना बोलावून पोलिसांनी दम भरला आहे.

गुन्हेगारीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही. बेकायदेशीर कृत्यात सहभागी व्हायचे नाही, सोशल मीडियावर व्हिडिओ किंवा रील्स टाकायच्या नाहीत. राहण्याचा पत्ता किंवा मोबाईल बदलल्यास तो क्रमांक बदलल्याची माहिती पोलीस ठाण्यात किंवा गुन्हे शाखेच्या युनिटला हजर राहून कळवावी, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT