Tenant Verification Drive: Cases Registered Against 76 Property Owners in Pune saam tv
मुंबई/पुणे

इमारतीमधील प्लॅट भाड्यानं देताय? 'ही' चूक पडू शकते महागात; काय आहे भाडेकरूबाबतचा नियम?

Police Cases Registered Against 76 Landlords: भाडेकरू व पीजी सदस्यांची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी पुण्यातील ७६ घरमालक आणि पीजी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील दहा दिवसांत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही विशेष मोहीम राबवून गुन्हे दाखल करण्यात आलेत.

Bharat Jadhav

  • भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या ७६ घरमालक आणि पीजी चालकांवर गुन्हे दाखल

  • मागील दहा दिवसांत विविध पोलीस ठाण्यांत विशेष पडताळणी मोहीम

  • भाडेकरू व पेइंग गेस्ट यांची पोलिस पडताळणी न केल्यास घरमालकांवर कायदेशीर कारवाई

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

तुम्ही तुमचं घर भाड्यानं दिलंय, तर तुम्ही तुमच्या भाडेकरूंची माहिती पोलिसांना दिलीय का? जर तुम्ही भाडेकरूं आणि पीजीमधील सदस्यांची माहिती पोलिसांना दिली नसेल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. पुण्यातील घरमालक आणि पीजी चालकांवर गु्हा दाखल करण्यात आलाय.

भाडेकरूंची माहिती लपवणाऱ्या पुणे शहरातील ७६ घरमालक आणि ‘पीजी’ चालकांवर गुन्हे दाखल झाली आहेत. भाडेकरू आणि ‘पेइंग गेस्ट’ (पीजी) पडताळणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या घरमालकांविरोधात पोलिसांनी आता कठोर पावले उचलली आहेत. मागील दहा दिवसांत सदनिका किंवा दुकाने अनधिकृतपणे भाड्याने देणाऱ्या ७६ घरमालक आणि ‘पीजी’ चालकांवर विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

खडकी,शिवाजीनगर आंबेगाव ,वाघोली पोलिस स्टेशन हद्दीतील घरमालक भाडेकरू माहिती न पुरवल्यामुळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तर लोहगाव हद्दीत‘पेइंग गेस्ट’ चालवणाऱ्या चालकांनी भाडेकरू/विद्यार्थ्यांची माहिती पोलिस ठाण्याला न दिल्याने तीन पीजी चालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय शिवाजीनगर,वारजे, लोणी काळभोरसह इतर पोलीस ठाण्यातही संबंधित घरमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुणे ग्रामीण जिल्हयातील घरमालकांनी त्यांच्या घरात भाडेकरु ठेवताना संबंधित भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये त्यांची माहिती द्यावी, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी आदेश केलेत. पोलीस स्टेशनला माहिती देतांना भाडेकरुचे संपूर्ण नाव, सद्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन छायाचित्रे, त्यांना ओळखणा-या व्यक्तींचे नाव व पत्ता, घरभाडे करारनामा, ओळखपत्र आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला न दिल्यास भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ प्रगाणे दंडनीय कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

साखर महागली, ग्राहकांची पळापळ; बाजारात प्रतिव्यक्ती 1 किलोच साखर

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

SCROLL FOR NEXT