Sassoon Hospital Money Fraud  Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : ससून रुग्णालयात सर्वात मोठा घोटाळा; कर्मचाऱ्यांनी हडपले कोट्यवधी रुपये, २३ जणांविरोधात गुन्हा

Sassoon Hospital Money Fraud : ससून रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपये हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Satish Daud

नितीन पाटणकर, साम टीव्ही

पुणे येथील ससून रुग्णालय नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. काही महिन्यांपूर्वी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळे या रुग्णालयाची संपूर्ण महाराष्ट्रभरात चर्चा झाली होती. त्यानंतर पोर्शे कार अपघात प्रकरणातही रुग्णालयात गैरप्रकार झाल्याचं समोर आलं. आता थेट ससून रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपये हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अधिकाराचा गैरफायदा घेत ससूनमधील (Sassoon Hospital) कर्मचाऱ्यांनी चक्क रुग्णालयाच्या ४ कोटी १८ लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. हा गैरप्रकार लक्षात येताच ससुनचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून बंड गार्डन पोलिसांनी रुग्णालयातील १६ कर्मचारी आणि ७ खाजगी व्यक्ती अशा एकूण २३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अनिल माने आणि सुलक्षणा चाबुकस्वार अशी गुन्हा दाखल झालेल्या मुख्य आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक गैरव्यवहाराचा (Money Fraud) हा प्रकार ३१ जुलै २०२३ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत घडला आहे. अनिल माने हा ससून रुग्णालयात अकाऊटंट असून चाबुकस्वार रोखपाल म्हणून काम करते.

काही दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या शासकीय नोंदवहीत आर्थिक तफावत असल्याची बाब समोर आली होती. याबाबत वैद्यकीय संचालनालयाच्या स्तरावर चौकशी समिती नेमण्यात आली. या चौकशीमध्ये तब्बल ४ कोटी १८ लाख रुपयां आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. त्यामुळे रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

त्यांच्या तक्रारीनंतर तात्काळ बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच प्रशासनाने अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गैरव्यवहारामध्ये लेखपाल माने यांच्यासह रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक, लिपिक, परिचारिका, तंत्रज्ञ यांच्यासह काही खासगी व्यक्तींचा सहभाग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT