Pune crime news Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Pune Crime: इन्स्टावर रील आणि पिस्तुलांची डील; पुण्यातील कुप्रसिद्ध डीलर 'बबलू' लातूरमध्ये लॉक

Pune Crime Branch News : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोशल मीडियावरून पिस्तुलांची खरेदी-विक्री करणाऱ्या कुप्रसिद्ध 'बबलू'ला लातूरमधून अटक केली. आरोपीकडून ५ पिस्तुल आणि ७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Akshay Badve

Pune crime news : सोशल मिडियावरून खरेदी विक्री करणारा पिस्तुल डीलर "बबलू" याला पोलिसांनी अखेर पेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने लातूरमध्ये बबलूला सापळा रचून अटक केली. बबलू इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करून पिस्तुलांची खरेदी विक्री करत होता. पिस्तूलचा भलताच "शौक" असलेल्या बबलूचे सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल झाले होते. अटक केलेल्या आरोपीकडून तब्बल ५ पिस्तुल आणि ७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील पर्वती पोलिस ठाणे, खडक पोलिस ठाणे आणि वाघोली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यात एक तरुण पोलिसांच्या रडार वर होता. संबंधित तरुण हा पिस्तूल विक्रेता असल्याची माहिती पोलिसांना होती. शेख अहमद उर्फ बबलु सुरज सय्यद असे या तरुणाचे नाव असून तो पुण्यातील बिबवेवाडी भागात राहणारा आहे.

पुण्यातील अनेक गोळीबाराच्या घटनांमध्ये वापरले गेलेले पिस्तूल हे बबलू ने विक्री केल्याचं याआधी सुद्धा तपासातून समोर आलं होतं. या अनुषंगाने पुणे पोलिस त्याचा शोध घेत होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांना बबलू हा लातूर जिल्ह्यातील एका गावात लपल्याची माहिती मिळालं होती. यानुसार गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने लातूर मध्ये जात सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं.

त्याच्याकडे अधिक तपास करता बबलू हा सोशल मिडीया वरुन गावठी पिस्टल सोबत फोटो काढुन ते प्रसारीत करत होता व पिस्टल व काडतुसे यांची खरेदी विक्री बाबत इंस्टाग्राम वरुन संपर्क साधत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी ने मध्यप्रदेश येथील उमरठी गावातील पिस्तूल विक्रेते यांच्या संपर्कात स्वतः राहुन त्याच्याकडून आपल्या ओळखीचे लोकांना तिथे पाठवुन मध्यस्थी करुन गावठी पिस्टल खरेदी करत असल्याचं सुद्धा समोर आलं आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ५ पिस्तूल सह ७ जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, आरोपीकडे आणखी काही पिस्तुल आहेत का? तसेच त्याने कोणाकोणाला पिस्तूल विकले होते याचा तपास सुरू आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : "...तर पुढच्यावेळी डोक्यात गोळ्या घालू" लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्यवसायिकाच्या ऑफिसवर गोळीबार

मुगाच्या डाळीपासून बनवा हेल्दी आणि टेस्टी 5 पदार्थ, चव लागेल भारी

Explainer: 'Operation Tiger' पूर्ण, आता पुढे काय? श्रीकांत शिंदेंकडून नव्या ऑपरेशनचे संकेत,ठाकरे नेत्यांची गळती रोखू शकतील?

Chips side effects: भूक लागली की चिप्स खाताय? पाहा तुमच्या शरीरासाठी किती धोकादायक ठरतेय ही सवय

IAS transfer : राज्यात पुन्हा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कुणाची कुठे झाली नियुक्ती

SCROLL FOR NEXT