Pune Mosque Saam
मुंबई/पुणे

Pune News: मशिदीमध्ये बाहेरील मुस्लिमांना नो एन्ट्री, पुण्यातील 'या' गावाकडून ठराव

Security Concerns Mosque Entry Ban in Pirangut: पिरंगूटमध्ये स्थानिक मुस्लिमांना वगळता इतर मुस्लिमांना मशिदीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पिरंगूटच्या ग्रामपंचायतीने घेतलेल्या बैठकीत गावातील मशिदीच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशाचं वातावरण ढवळून निघालं. या हल्ल्यानंतर भारतातूनही सडेतोड उत्तर देण्यात येत आहे. अशातच पुण्यातील पिरंगूटमधील स्थानिक मुस्लिमांना एक ठराव मंजूर केला आहे. ठरावानुसार, स्थानिक मुस्लिम वगळता, इतर मुस्लिमांना मशिदीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पिरंगूटच्या ग्रामपंचायतीने घेतलेल्या बैठकीत गावातील मशिदीच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

या ठरावानुसार, पिरंगुट स्थानिक मुस्लीम बांधव वगळता परप्रांतिय, व्यवसायानिमित्त पंचक्रोशी आणि आजूबाजूच्या गावातील मुस्लीम बांधवांना मशिदीत प्रवेश करण्यास आणि प्रार्थनेसाठी येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीदरम्यान विशेष सभेत घेतलेल्या निर्णयानुसार, गावातील कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी तसेच मशिदीच्या क्षमतेपेक्षा बाहेरील बांधवांचा अनावश्यक भार टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.

पिरंगुटच्या ग्रामपंचायतीने जाहीर सूचना असं लिहिलेल्या बोर्डवरचा मसुदा खालील प्रमाणे:

"पिरंगुट गावामध्ये बाहेरून येणार्‍या सर्व मुस्लीम बांधवांना कळवण्यात येते की, समस्त गावकरी मंडळी, पिरंगुट आणि स्थानिक मुस्लीम बांधव यांच्या विशेष सभेमध्ये झालेल्या ठरावानुसार गावातील मशिदीत प्रवेश फक्त स्थानिक मुस्लीम बांधवांसाठीच ठेवण्यात येईल. परप्रांतीय, पंचक्रोशी आणि इतर आजूबाजूच्या गावातील मुस्लीम बांधवांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा सुव्यवस्थेसाठी हा निर्णय घेतला गेला आहे."

या ठरावाच्या खाली समस्त गावकरींचा उल्लेख करण्यात आला असून, हा निर्णय ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये घेतलेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

आरसीबीच्या विजयानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; पॉइंट टेबलमध्येही मोठा उलटफेर

Monday Horoscope: पैशाच्या समस्या कमी होतील, ५ राशींसाठी भरभराटीचा दिवस; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT