पुणे आणखी एका हत्येने हादरलं! भर चौकात तरुणाची गोळ्या घालून हत्या
पुणे आणखी एका हत्येने हादरलं! भर चौकात तरुणाची गोळ्या घालून हत्या Saam tv
मुंबई/पुणे

पुणे आणखी एका हत्येने हादरलं! भर चौकात तरुणाची गोळ्या घालून हत्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - पुणे आणखी एका हत्येने हादरले आहे. शेलपिंपळगाव येथे भर चौकात एका तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास खेड तालुक्यात हा खून झाल्याची माहिती समोर आहे. भर चौकात पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची माहिती समोर आहे. नागेश सुभाष कराळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्ल्यानंतर आरोपी हा फरार झाले आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

हे देखील पहा -

या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. नागेश कराळे हे आपल्या वाहनात बसत असताना हे मारेकरी एका चारचाकी वाहनातून आले आणि त्यांनी कराळे यांच्यावर पिस्तूलमधून चार ते पाच राऊंड फायर केले. या घटनेत नागेश गंभीर जखमी झाले. त्यांनतर त्यांना चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जुन्या वादातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज चाकण पोलिसांनी लावला आहे. मात्र ही हत्या कोणी आणि का केली आणि त्यामागील कारण काय, हे अद्याप अस्पष्ट आहे.या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल धाव घेऊन पाहणी केली. चाकण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत पंचनामा व फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू होते.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dindori Lok Sabha: आधी थोपटले दंड आता मिळवले हात; दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार

Govinda And Krushna Abhishek : कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय?; गोविंदा जरा स्पष्टच बोलला

Today's Marathi News Live: भाजपचे पुण्यातील उमेदवार यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे घेणार सभा

Raireshwar Fort: १६० मतदारांसाठी अधिकारी, कर्मचा-यांचा ४ हजार ५०५ फुटापर्यंत ट्रेक, रायरेश्वर केंद्र मतदानासाठी सज्ज

Black Pepper Benefits: काळी मिरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

SCROLL FOR NEXT