Shirur news  Saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात सहावीतील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; पालकांमध्ये भीतीचं वातावरण

Shirur news : पुण्यात सहावीतील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेने पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

रोहिदास गाडगे

पुणे जिल्ह्यात सहावीतील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झालाय

पुण्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी येथे घटना घडली

विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

पुणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एसएससी परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना ताजी असताना शिरूरमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पु्ण्याच्या शिरूर तालुक्यातील दहिवडीमध्ये सहावीतील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हादरला आहे. या घटनेने पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

पुण्याच्या शिरूर तालुक्यातील दहिवडी येथे सहावीतील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झालाय. साई मांजरे असं मृत मुलाचं नाव आहे. तो तळेगाव ढमढेरे येथील शाळेत शिक्षण घेत होता. हा मृत्यू नेमका हत्या आहे की घातपात, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून पोलीस आणि वनविभागाच्या टीमकडून कसून तपास सुरू आहे.

एकीकडे परीक्षा केंद्रात हल्ला आणि दुसरीकडे अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू… या सलग घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी या प्रकरणाचा अवघ्या काही तासांत उलगडा करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वाघोलीत विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

तत्पूर्वी, पुण्याच्या वाघोलीत चहा पिण्यासाठी थांबलेल्या एका विद्यार्थ्यावर अचानक कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली होती. आरोपीने मारलेला कोयता थेट विद्यार्थ्याच्या डोक्यातच अडकून राहिला होता. या रक्तरंजित हल्ल्याचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. हा थरार वाघोलीतील रायसोनी कॉलेजसमोर घडला. जुन्या वादातून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात पीडित नागेश जगतापच्या डोक्यावर, पाठीवर आणि शरीरावर गंभीर वार झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यातील प्रसिद्ध मंदिर परिसरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला; १५० भाविक जखमी

Sambhajinagar: विहिरीच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून वडील अन् २ मुलांचा मृत्यू; संपूर्ण गावावर शोककळा

Thalapathy Vijay Photos: अभिनेता ते मुख्यमंत्री! थलापती विजय यांच्याबद्दलच्या 'या' ५ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Elvish Yadav Death Threat: ४८ तासांत १० कोटी दे, अन्यथा...; बिग बॉस स्टारला बिश्नोई गँगची जिवे मारण्याची धमकी

राजभवनात हायव्होल्टेज ड्रामा! राज्यपालांनी भर शपथविधीत थलापती विजय यांना रोखलं; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT