Shirur News Saam Tv
मुंबई/पुणे

Shirur News: बैलगाडा घाटात कौटुंबीक वाद, तुफान हाणामारीत तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

Bullock Cart Race In Shirur: बैलगाडी शर्यतीदरम्यान ही घटना घडली आहे. कौटुंबीक वादातून हा सर्व प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रोहिदास गाडगे

पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये (Shirur) धक्कादायक घटना घडली आहे. बैलगाडा घाटामध्ये तुफान राडा झाला असून हाणामारीमध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. बैलगाडी शर्यतीदरम्यान ही घटना घडली आहे. कौटुंबीक वादातून हा सर्व प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या शिरूर तालुक्यातील मलठण येथील शिंदेवाडीमध्ये आज यात्रा आहे. यात्रेनिमित्ताने गावामध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीमध्येच दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली. दोन कुटुंबातील हा वाद आहे. बैलगाडा शर्यतीदरम्यान दोन्ही कुटुंबातील काही सदस्य आमने-सामने आले. एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला काठीने बेदम माराहण केली.

मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला तात्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. हाणामारी करणारी ही दोन्ही कुटुंब शिंदेवाडी येथीलच आहेत. या दोन्ही कुटुंबातील भांडणाचे कारण अद्याप समोर आले नाही.

ही घटना घडली त्यावेळी संपूर्ण गाव बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आले होते. त्याच ठिकाणी ही हाणामारी सुरू असताना देखील एकही व्यक्ती त्यांच्यातील वाद सोडवण्यासाठी आला नाही. एका तरुणाला काठीने जीव जाईपर्यंत दुसरा तरुण मारत असताना देखील घटनास्थळी सर्वजण बघ्याच्या भूमिकेत होते. अनेक जण मोबाईलमध्ये ही घटना कैद करण्यामध्ये व्यस्त होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amalner Crime : जन्मदात्या बापाला मुलाने संपविले; खुनाच्या घटनेने अमळनेरात खळबळ

CSMT स्थानकात मराठा आंदोलकांचा गोंधळ, रूळावर उतरून लोकल अडवली, VIDEO समोर

Manoj jarange patil protest live updates: मराठा आंदोलकांसोबत पोलिस कर्मचाऱ्यांनी केले जेवण

Shocking: भयंकर! बहीण तरूणाच्या प्रेमात पडली, भावाच्या डोक्यात हैवान घुसला, चाकूच्या धाकावर दोनदा बलात्कार

Maharashtra Weather : पुन्हा जोरधार! पुढील २४ तास १७ जिल्ह्यात अति मुसळधार, IMD ने दिला इशारा

SCROLL FOR NEXT