young man drowns Tata Dam Maval  saam tv
मुंबई/पुणे

Pune News: दुर्देवी! पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूरच्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू; ९० तास उलटून गेले तरी...

Maval News: धरणाच्या खोलीचा अंदाज न आल्याने एक तरुण पाण्यात बुडाला तर त्याचा दुसरा मित्र पटकन बाहेर आला.

दिलीप कांबळे

Pune News: मावळातील टाटा धरण पाहण्यासाठी कोल्हापूरहून (Kolhapur) आलेल्या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. अर्जुन माने असे या युवकाचे नाव असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह रेस्क्यू टीम मृतदेहाचा शोध घेत आहे. मात्र ९० तास उलटून गेले तरीही मृतदेह अद्याप हाती लागला नसल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, मावळातील (Maval) निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापुरातील काही पर्यटक चार दिवसांपूर्वी मावळात आले होते. हे तरुण 5 तारखेला आंदर मावळातील टाटा धरणार फिरण्यासाठी गेले. त्यामधील अर्जुन माने आणि अक्षय कुंभार हे पाण्यात उतरले तर त्यांचे अन्य पाच मित्र किनाऱ्यावर उभे होते. पोहायला उतरलेल्या दोघांपैकी अर्जुन माने हा धरणाच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला तर त्याचा मित्र पटकन बाहेर आला. मित्र बुडाल्याचे लक्षात येताच तरुणांनी तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच वडगांव पोलीस आणि वन्यजीव रक्षक मावळची टीम अर्जुन मानेचा शोध घेवू लागली आहे. मात्र 90 तास उलटून गेले तरी मृतदेह हाती लागला नाही. या शोधकार्यात, खोपोलीतील आपघातग्रस्तांच्या मदतीची रेस्कु टीम तसेच लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्कु,टीमची मदत मोलाची होत आहे.

मात्र टाटा धरणाचा मोठा जलाशय,आणि त्यात अवकाळी पावसामुळे शोधकार्यात अडथळे येऊ लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Mumbai E Water Taxi : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! गेटवे ते जेएनपीए ‘ई वॉटर टॅक्सी’ २२ सप्टेंबरपासून धावणार

Mumbai Local: गुड न्यूज! मुंबई लोकलला ‘वंदे मेट्रो’चा लूक, एसी लोकल होणार १८ डब्यांची; कसा आहे रेल्वेचा प्लान?

Navratri 2025: यंदा नवरात्र उत्सव कधीपासून आहे? तारीख अन् मुहूर्त जाणून घ्या

Gold Rate: सणासुदीत सोनं १ तोळ्यामागे २० हजारांनी वाढणार, वाचा तज्ज्ञांनी का वर्तवला अंदाज

SCROLL FOR NEXT