Worms And Rat Feces In Anganwadi Poshan Aahar Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: धक्कादायक! मुलांच्या जीवाशी खेळ सुरू, पोषण आहारात आढळल्या अळ्या आणि उंदराची विष्ठा

Worms And Rat Feces In Anganwadi Poshan Aahar: पुण्यातील जनता वसाहतीमध्ये (Janta Vasahat) हा प्रकार घडला आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या काँग्रेस रिक्षा संघटनाचे अध्यक्ष संदिप काळे यांनी हा सर्वप्रकार उघडकीस आणला आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. लहान मुलांना अंगणवाडीमध्ये (Anganwadi) दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये उंदराची विष्ठा आणि अळ्या आढळल्या आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील जनता वसाहतीमध्ये (Janta Vasahat) हा प्रकार घडला आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अशाप्रकराचा पोषण आहार देऊन सरकार (Maharashtra Government) मुलांच्या जीवाळी खेळ करत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंगणवाडीमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यात उंदरांच्या लेंड्या आणि अळ्या सापडल्या आहेत. एकात्मिक बाल योजना अंतर्गत अंगणवाडीमधील मुलांना देण्यात येणाऱ्या कडधान्यात अळया आणि उंदराच्या लेंड्या सापडल्या आहेत. एकात्मिक बाल योजना ही महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत येते. वाटप करणाऱ्या प्रशासकीय अधिकारीने पाकीट फोडल्यानंतर पहिल्याच पाकिटात अळया आणि उंदरांच्या लेंड्या आढळून आल्या.

हा सर्वप्रकार पुण्यातल्या जनता वसाहतमधील पान आळीमध्ये घडला आहे. राष्ट्रवादीच्या काँग्रेस रिक्षा संघटनाचे अध्यक्ष संदिप काळे यांनी हा सर्वप्रकार उघडकीस आणला आहे. सरकार लहान मुलांच्या जीवाशी खेळत आहे असल्याचा आरोप सध्या पान आळीमधील नागरिक करत आहेत. पोषण आहारामध्ये आळ्या आणि उंदरांच्या लेंड्या आढळल्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय पोषण आहाराच्या धान्याला किड लागल्याचा प्रकार २५ जूनला समोर आला होता. खेड तालुक्यातील बहुळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हा प्रकार घडला होता. शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदूळ, मटकी, मूगडाळ यांना किडे आणि आळ्या लागल्याचे समोर आले होते. स्थानिक ग्रामस्थांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT