वंशाच्या दिव्यासाठी 6 मुलींना जन्म देणाऱ्या महिलेला पतीने सोडले वाऱ्यावर
वंशाच्या दिव्यासाठी 6 मुलींना जन्म देणाऱ्या महिलेला पतीने सोडले वाऱ्यावर Saam TV
मुंबई/पुणे

वंशाच्या दिव्यासाठी 6 मुलींना जन्म देणाऱ्या महिलेला पतीने सोडले वाऱ्यावर

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: दरवर्षी नवरात्र उत्सवात आदिशक्ती चा जागर केला जातो, याच दरम्यान कन्यापूजनही केलं जातं. एकीकडे हा उत्सव साजरा होत असताना दुसरीकडे मात्र मुलाच्या हव्यासापोटी 6 मुली जन्माला आल्याने एका विवाहितेचा अतोनात छळ होत आहे. तेही पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरातील एका सुशिक्षित कुटुंबात. कुणालाही हेवा वाटावा अशा सहा गोंडस मुली, या मुलींच्या आईचं नाव आहे भाग्यश्री जाधव, भाग्यश्री सध्या एकल पालक आहे, केवळ मुली झाल्याने त्यांचा पती भाग्यश्री आणि मुलींचा सांभाळ करत नाहीय, गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील हडपसर मध्ये त्या मुलींसह राहतात.

भाग्यश्री चांगल्या शिकलेल्या ही आहेत 2012 साली भाग्यश्री यांचं लग्न दयानंद जाधव यांच्यासोबत झालं. 2013 साली त्यांना पहिली मुलगी झाली,. 2015 ला दुसरी मुलगी झाली त्यानंतर सासरच्या लोकांनी त्रास द्यायला सुरवात केली, पुन्हा 2016 मुलगी झाल्याने सासरच्या लोकांनी शारीरिक आणि मानसिक छळ केला. मुलाचा हव्यास दयानंद याना स्वस्थ बसू देत नव्हता त्यामुळे भाग्यश्री पुन्हा गरोदर राहिल्या आणि 2018 ला त्यांना तिळे झाले आणि त्या तिन्ही मुली झाल्या त्यानंतर मारहाण करुन पतीनं आणि सासरच्या माणसांनी त्यांना घरातून हाकलून लावलं तेव्हा पासून त्या हडपसर मध्ये मुलींसह राहतात.

शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आज या महिलेची भेट घेतली आहे. कायदेशीर बाजूने लढा देण्यासाठी आपण सोबत असल्याचे सांगत भाग्यश्री यांच्या मुलीना मदत करुन कन्यापूजन केल्याचे निलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. स्त्री जन्माचे स्वागत करायला हवे हे आजही सांगावे लागते यासारखी शोकांतिका नाही, केवळ मुलाच्या हव्यासापोटी भाग्यश्री यांना 6 मुलींना जन्म द्यावा लागला तेही एका सुशिक्षित कुटुंबात.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Lok Sabha Votting Live: बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

Google Pixel 8a: गुगल करणार Pixel 8 सीरीजचा सर्वात स्वस्त फोन लाँच; फीचर्स झाले लीक

Breakfast Recipe: नाश्ट्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी दुधीची खास रेसिपी

Breakfast Recipes : सकाळी ऑफिसला जाण्याच्या घाईत झटपट होणारा नाश्ता; 5 हेल्दी रेसिपी

Baramati Lok Sabha: आमदार रोहित पवारांना तातडीने अटक करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी, बारामतीत काय घडतंय?

SCROLL FOR NEXT