Bank Manager Stole Gold Worth Rs 3 Crore Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : बँकेच्या महिला व्यवस्थापकाने हात साफ केला, तब्बल ३ कोटींचं सोनं चोरलं; पुण्यातील धक्कादायक घटना

Priya More

नितीन पाटणकर, पुणे

पुण्यामध्ये बँकेच्या लॉकरमधील पावणे तीन कोटी रुपयांचे सोनं चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बँकेच्या महिला व्यवस्थापकानेच हे सोनं चोरलं. पुण्यातील पंजाब नॅशनल बँकेमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात पंजाब नॅशनल बँकेच्या महिला व्यवस्थापकाने बँकेच्या लॉकरमधून तब्बल पावणे तीन कोटी रुपयांचे सोने चोरलं. नयना अजवानी असे सोनं चोरलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या महिला व्यवस्थापकाचे नाव आहे. पुण्यातील सोपान बाग परिसरात राहणाऱ्या एका ४९ वर्षीय नागरिकांने कॅम्प परिसरात असलेल्या आरोरा टावर येथील पंजाब नॅशनल बँकेतील लॉकरमध्ये पावणेतीन कोटी रुपयांचे सोनं लॉकरमध्ये ठेवले होते.

बँकेची महिला व्यवस्थापक नयना अजवानीने बँकेच्या लॉकरमधील सोनं चोरले. हे सोनं नयना अजवानी, सुरेंद्र शहानी यांनी चोरून ज्वेलर्स सतीश पंजाबी यांच्या दुकानात वितळवले. या चोरी प्रकरणी पुण्याच्या लष्कर पोलिस ठाण्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापिका नयना अजवानी, सुरेंद्र शहाणी आणि ज्वेलर सतीश पंजाबी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Congress : माजी आमदाराच्या वक्तव्यावरून काँग्रेसच्या बैठकीत वाद; पदाधिकाऱ्यांमध्ये झाली झटापट

Bachchu Kadu: दोन महिन्यानंतर हे भाऊ सावत्र होतील; लाडकी बहिणी योजेनेवरून बच्चू कडू यांची कोपरखळी

Pimples Problem: चेहऱ्यावर 'हा' पदार्थ वापल्यास पिंपल्सच्या समस्या होतील दूर....

'Stree 2' Aaj Ki Raat Song: 'स्त्री 2'मध्ये 'आज की रात' गाण्याची निवड का केली? दिग्दर्शकाने केला खुलासा

Marathi News Live Updates: पुणे, रायगड, रत्नागिरीमध्ये रेड अर्लट; पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा

SCROLL FOR NEXT