Pune Water Supply Updates
Pune Water Supply Updates Saam TV
मुंबई/पुणे

Pune : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा; शहरातील 'या' भागात २ दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

पुणे : पुणेकरांच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यात समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत टाकण्यात आलेल्या मुख्य जलवाहिन्यांवर फ्लोमीटर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे आज आणि उद्या शहराच्या काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांना दोन दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे. (Latest Marathi News)

पुण्यात (Pune) जलवाहिन्यांच्या कामासाठी दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल,असे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

पुण्यात बुधवारी सणस पंपिंग स्टेशन : नर्‍हे, धायरी मानस परिसर, धायरी खंडोबा मंदिर परिसर गल्ली क्र. बी 10 ते बी 14 या भागाचा पाणी पुरवठा बंद राहील.

तर गुरुवारी शहरातील चतु:शृंगी टाकी परिसर, बोपोडी, अनगळ पार्क, खडकी, सहारा हॉटेल, राजभवन, पंचवटी, औंध, खडकी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी, अभिमानश्री सोसायटी.

पद्मावती टाकी परिसर : बिबवेवाडी, अप्पर व सुपर इंदिरानगर, संभाजीनगर, काशिनाथ पाटीलनगर, लोअर इंदिरानगर, चिंतामणीनगर, स्टेट बँकनगर, लेकटाऊन, गंगाधाम, बिबवेवाडी-कोंढवा रस्ता, विद्यासागर कॉलनी, सॅलिसबरी पार्क, महर्षिनगर, डायस प्लॉट, मार्केट यार्ड, धनकवडी, गुलाबनगर, चैतन्यनगर, तळजाई वसाहत परिसर.

नवीन कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्र ः ससाणेनगर, काळेबोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, वानवडी, चंदननगर, खराडी, रामटेकडी, माळवाडी, भोसले गार्डन, 15 नंबर आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेवनगर या भागात पाणीपुरवठा (Water Supply) बंद राहील.

पुण्यात जलवाहतूक सुरू होणार?

रस्ते व रेल्वे,मेट्रो वाहतुकीला पर्याय म्हणून जलवाहतुकीवर भर दिला जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून मुळा-मुठा नद्यांमधून २०२५ नंतर बोटीच्या माध्यमातून जलप्रवास करण्याची सोय केंद्रीय प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिका करणार आहे.

यासाठी प्राथमिक स्तरावर काम सुरू झाले आहे.स्वस्त व प्रदूषणमुक्त सुखकर प्रवास करण्याची सोय व्हावी, यासाठी केंद्र सरकारच्या साह्याने नदीपात्रालगत सौंदर्यीकरण व रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याचे सादरीकरण महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह इतर सदस्यांनी मंगळवारी 'धारा २०२३ परिषदे'त केले. दोन वर्षांत हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार राज्यमंत्र्यांनी दिल्या आहेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Care Tips: उन्हाळ्यात बाईकची काळजी कशी घ्याल? या भन्नाट ट्रिक्स फॉलो करा

Weightloss Tips: मासिक पाळीनंतर खा हे पदार्थ , वजन होईल कमी

Shubman Gill Statement: गुजरातचं नेमकं चुकतय तरी कुठं? कर्णधार शुभमन गिलने सांगितली पराभवाची कारणं

Mahadev Betting App Case : २००० सीम कार्ड, १७०० बँक खाते, ३२ आरोपी आणि १५००० कोटींचा स्कॅम; काय आहे महादेव बेटिंग अॅप घोटाळा?

Why Aamir Khan Called Mr. Perfectionist : आमिर खानला ‘बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट’चा टॅग कसा मिळाला?; शबाना आझमीचं नाव सांगत म्हणाला...

SCROLL FOR NEXT