Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : संतापजनक! दोन वृद्धांकडून शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार; पुणे शहराला हादरवून टाकणारी घटना

Pune Crime News : पुण्यात दोन वृद्ध व्यक्तींनी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला. इतकंच नाही, तर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या.

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही

राज्यात महिला तसेच अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वी बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच पुण्यातही अशाच प्रकारची संतापजनक घटना घडली. पुण्यात दोन वृद्ध व्यक्तींनी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला. इतकंच नाही, तर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या.

याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी (Police) दोन्ही आरोपींविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ७८ वर्षीय वृद्धाने ७ वर्षीय मुलीच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

तर, अन्य एका घटनेत ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने ८ वर्षीय मुलीवर अत्याचार (Crime) केल्याचे उघडकीस आले. पहिल्या घटनेत ७ वर्षीय पीडित मुलीच्या आजीने फिर्याद दिली आहे. मधुकर पिराजी थिटे (वय ७८, रा. धनकवडी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी शुक्रवारी (ता. ६) मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून घरी नेले. त्यानंतर त्याने मुलीवर अत्याचार केला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर त्याने तिचे तोंड दाबून गळ्याला चाकू लावला. तसेच, घरी किंवा पोलिसांना सांगितल्यास मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली,

तर दुसऱ्या घटनेत ज्येष्ठ नागरिकाने अल्पवयीन मुलीला चॉकलेटसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. महावीर श्रीमलजी सिंगवी (वय ७०, रा. धनकवडी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड|VIDEO

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड

Health Care : जास्त प्रमाणात खजूर खाल्याने आरोग्यावर होतात 'हे' 5 गंभीर परिणाम; जाणून घ्या

Inhaled insulin: डायबेटीजग्रस्तांची इन्सुलिनच्या इंजेक्शनची कटकट संपणार; आता श्वासाद्वारे घेता येणार इन्सुलिन

किचनच्या फरशीवर असणारे हट्टी डाग चुटकीसरशी काढा

SCROLL FOR NEXT