Supriya Sule News Saam TV
मुंबई/पुणे

Supriya Sule News: 'विधानसभेमुळे लाडकी बहिण, भाऊ सगळे आठवतील', अर्थसंकल्पावरुन सुप्रिया सुळेंचा महायुतीला खोचक टोला!

Maharashtra Politics Latest News: एकीकडे हा अर्थसंकल्प ऐतिहासिक असल्याचे सत्ताधारी सांगत असतानाच विरोधक मात्र जोरदार टीका करत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्याच्या बजेटवरुन महायुतीवर निशाणा साधला आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड, ता. ३० जून २०२४

सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी अधिवेशनामध्ये राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. एकीकडे हा अर्थसंकल्प ऐतिहासिक असल्याचे सत्ताधारी सांगत असतानाच विरोधक मात्र जोरदार टीका करत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्याच्या बजेटवरुन महायुतीवर निशाणा साधला आहे.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दापोडी येथे पती सदानंद सुळे यांच्यासोबत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

"राज्य सरकारतर्फे वारकऱ्यांच्या दिंडीला दिले जाणार अनुदान म्हणजे हा एक जुमला आहे. आणि आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून अशा प्रकारे अनेक जुमल्यांचा पाऊस पडत राहणार, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच विधानसभा निवडणुका असल्याने या सरकारला लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजना आठवत आहेत. मात्र या योजनेत अनेक त्रुटी आहेत त्यांचा आमचा अभ्यास सुरू आहे," अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी होणारे प्रवेशाविषयी बोलणे सुप्रिया सुळे यांनी टाळले. "इंद्रायणी नदीचा प्रदूषण हे अत्यंत दुर्दैवी असून शिरूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अमोल कोल्हे हे देखील इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी अतिशय जातीने प्रयत्न करत आहेत, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT