Manipur Citizens Meet Sharad Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : मणिपूरमधील परिस्थिती गंभीर, PM मोदींसोबत चर्चा करा; शरद पवारांकडे नागरिकांची मागणी

Manipur Citizens Meet Sharad Pawar: मणिपूरमधील परिस्थिती गंभीर आहे. यासाठी मणिपूरच्या नागरिकांनी शरद पवार यांची भेट घेत चर्चा केली आणि यासंदर्भात पीएम मोदींशी बोलण्याचे आवाहन केले.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

मणिपूरमधील परिस्थिती खूपच गंभीर आहे. याचसंदर्भात मणिपूरमधील काही नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. ३ जणांच्या शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेत चर्चा केली. यावेळी झालेल्या बैठकीमध्ये या नागरिकांनी शरद पवारांनी मणिपूरमधील परिस्थितीवर आणि मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करावी, अशी मागणी केली. यावेळी शरद पवारांनी पीएम मोदींशी बोलतो असे आश्वासन दिले.

गेल्या काही वर्षांपासून मणिपूर येथील परिस्थिती ही चिंताजनक झाली असून अजूनही मणिपूर हे जळत आहे. मणिपूर येथील परिस्थितीबाबत आज मणिपूर येथील काही पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत मणिपूर येथे सुरू असलेल्या परिस्थितीबाबत माहिती दिली. मणिपूर येथे शांतता निर्माण व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

आज पुण्यातील मोदीबाग येथील शरद पवार यांच्या निवासस्थांनी मणिपूर येथील ज्येष्ठ पत्रकार केशम याईफाबा, सरोजकुमार शर्मा, ब्रोझन्द्रा निंगोंबा यांनी भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार केशम याईफाबा म्हणाले की, आम्ही राज्यातील अनेक राजकारणी, तसेच सामाजिक संस्था यांना भेटून मणिपूर येथील परिस्थितीबाबत चर्चा करत आहोत. आज आम्ही शरद पवार यांची भेट घेऊन तेथील परिस्थितीबाबत त्यांना माहिती दिली आणि दोन्ही समुदायांमध्ये कशी शांतता निर्माण होईल यासाठी केंद्र सरकारमध्ये आपण याबाबत बातचीत करावी अशी मागणी केली.

या चर्चेदरम्यान शरद पवारांनी याबाबत मी लवकरच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून मणिपूरमध्ये लवकरात लवकर शांतता आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी आजच्या भेटीत आम्हाला सांगितलं आहे. तसेच याबाबत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री यांना देखील भेटणार असल्याचे यावेळी मणिपूरच्या नागरिकांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT