pune news Saam tv
मुंबई/पुणे

Pune Road Accident : पुण्यात खड्ड्यानं घेतला वृद्धाचा जीव; अपघाताचा थरार CCTV कैद, VIDEO

pune News in Marathi : औंधमधील रस्त्यावरचा खड्डा आता 'किलर खड्डा' म्हणून ओळखला जातोय.. खड्ड्यानं एका 61 वर्षीय वृद्धाचा जीव घेतलाय.. अपघाताचा हा थरार पाहूयात.. या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

पुण्यातील औंधसारख्य़ा गजबजलेल्या परिसरात घडलेल्या अपघाताची ही थरारक दृश्य. 61 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक गाडी चालवत असताना अचानक त्यांची खड्ड्यात पडली.त्यांचा तोल सुटून ते खाली पडले आणि मागून येणाऱ्या गाडीच्या खाली आले.

या अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर थेट सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अशी मागणी आता स्थानिक नागरिकांनी केलीय.

एका महिन्यात खड्डयामुळे चार जणांना जीव गमवावा लागलाय..

पुण्यातील जीवघेणे खड्डे

10 जुलै 2025

पुण्यात शिक्षकाचा खड्ड्यात पडून मृत्यू

14 जुलै 2025

चाकण- तळेगाव रस्त्यावर खड्ड्यामुळे दुचाकी घसरुन तरुणाचा मृत्यू

30 जुलै 2025

शिवाजीनगरमध्ये खड्डा चुकवताना कंटेनरची दुचाकीस्वाराला धडक

30 जुलै 2025

औंधमध्ये पेविंग ब्लॉकच्या खड्ड्यामुळे 61 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू

दरम्यान पुणे महापालिका दरवर्षी रस्त्यावरील खड्ड्यांसाठी किती रुपये खर्च करते पाहूयात..

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी किती खर्च?

(पुणे महापालिकेच्या 2024च्या आकडेवारीनुसार)

रस्ते विभागाचं वार्षिक बजेट 1 हजार कोटी रूपये

खड्डे दुरुस्तीचे वार्षिक बजेट अंदाजे 20 कोटी रुपये

जून 2025 मध्ये पालिकेचा 1790 पेक्षा अधिक खड्डे बुजवल्याचा दावा

राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन अनेकदा स्थानिक नेत्यांकडून आणि महापालिका प्रशासनाकडून केलं जातं. मात्र तरीही राज्यात ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतयं...आणि काहीही अपराध नसताना अनेकांचा जीव जातोय...अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत..याची जबाबदारी कोण घेणार..की केवळ कंत्राटदांरांना दंड आकारण्याच्या घोषणा करून नेते आणि प्रशासन आपले हात झटकणार...

आता तरी प्रशासनाला जाग येणार का? खड्डेमुक्त रस्त्यांच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी कधी होणार? याकडे सर्वसामन्य नागरिकाचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या धक्क्यातून फडणवीस सावरले नाहीत, संजय राऊतांचा टोला

Bhagavad Gita: भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात कोणती शिकवण मिळते?

...तर बाळाला फेकून देईन अन् मीही आत्महत्या करेल, PCMC अधिकाऱ्याला महिलेची धमकी|VIDEO

Maharashtra Live News Update : गर्दी झाली नाही म्हणून मंत्री चिडल्या, कानाखाली मारण्याची भाषा – रोहित पवारांचा संताप

Video : सैन्यदलातील अधिकाऱ्याचा राडा! विमानतळावरील कर्मचाऱ्यांना मारहाण; एकाचा पाठीचा कणा तुटला, दुसऱ्याचा जबडा फाटला

SCROLL FOR NEXT