Pune School News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : मुली कपडे बदलायला गेल्या, वर बघितल्यानंतर हादरल्याच; पुण्याच्या नामांकित शाळेतला धक्कादायक प्रकार

Pune School News: पुण्यामध्ये एका नामांकित शाळेच्या चेंजिंग रुममध्ये मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शाळेच्या शिपायाला अटक केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील शाळेत चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समार आला आहे. पुण्यातील पाषाण भागातील नामांकित शाळेत ही घटना घडली. शाळेतील शिपायानेच व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याच समोर आलं आहे. शाळेतील किचनरूममध्ये ड्रेस चेंज करायला आलेल्या विद्यार्थिनींचे तो व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होता. याप्रकरणी चतुशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शाळेतील शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांनी अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार ६ जानेवारी रोजी घडला. शाळेत खेळाचा तास संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी शाळेत असणाऱ्या किचन रूममध्ये ड्रेस चेंज करायला गेल्या होत्या. तिथे शाळेतील शिपाई तुषार सरोदे हा उपस्थितीत होता. विद्यार्थीनींनी त्याला तिथून जायला सांगितले असता त्याने त्याचा मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेऊन रूममध्ये असलेल्या एका स्विच बोर्डवर ठेवला.

दरम्यान, हा सगळा प्रकार विद्यार्थिनींना लक्षात आला आणि त्यांनी तात्काळ व्हिडीओ मोबाईलमधून डिलीट केला. घडलेला संपूर्ण प्रकार विद्यार्थिनींनी घरी गेल्यावर आपल्या पालकांना सांगितला तेव्हा त्यांना धक्का बसला. पालकांनी शाळेतील मुख्यधापिका यांची भेट घेतली आणि तक्रार केली. यावेळी त्यांनी शिपाई तुषार सरोदे याला विचारले असता त्याने या प्रकरणाला नकार दिला.

मात्र हा प्रकार जेव्हा शाळेच्या व्यवस्थापनाला कळला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा सरोदे याची चौकशी केली असता त्याने त्याचा मोबाईल रेकॉर्डिंगसाठी ठेवला असल्याची कबुली दिली. यानंतर शाळेच्या व्याव्यस्थापनाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीच्या विरोधात पोक्सो सह बी. एन. एस कलम ७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समुद्रात भयंकर दुर्घटना! २४० प्रवाशांनी भरलेले जहाजच गायब; बचावकार्य सुरू

Gold Rate Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीही झाली स्वस्त, वाचा 24, 22 आणि १८ कॅरटचे आठवडाभराचे दर

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

Konkan Travel : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या नागरिकांचे हाल, रेल्वे १२ तास उशिराने, महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा

हार्ट हेल्थसाठी पुरुषांनी रोज किती चालावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT