Zika Virus Pune News Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Zika Virus: पुणेकरांनो काळजी घ्या! झिकाच्या रुग्णात झपाट्याने वाढ, रुग्णसंख्या ४८ वर

Pune Zika Virus Update: पुण्यातील झिका रुग्णांची संख्या ४८ वर पोहचली आहे. अशामध्ये पुणेकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेकडून केले जात आहे. पुणे महानगर पालिकेकडून उपाययोजना देखील केल्या जात आहेत.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये झिकाच्या (Pune Zika Virus) रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. झिका रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे पुणेकरांचे टेन्शन आणखी वाढले आहे. पुण्यामध्ये झिकाचे आणखी ९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यातील झिका रुग्णांची संख्या ४८ वर पोहचली आहे. अशामध्ये पुणेकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेकडून केले जात आहे. पुणे महानगर पालिकेकडून उपाययोजना देखील केल्या जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात झिकाचे रुग्ण वाढले आहेत. आणखी ९ रुग्णांना झिकाची बाधा झाल्याचे तपासणी अहवालात आढळून आले आहे. त्यामुळे आता बाधित रुग्णांची संख्या ही ४८ झाली आहे. ९ रुग्णांपैकी ७ रुग्ण पुणे महापालिका हद्दीतील वाघोलीमधील आहेत. तर पुणे ग्रामीण आणि पुणे कँटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

पुणे जिल्ह्यात झिकाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली. पुण्यात ९ नवे रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या आता ४८ वर पोहोचली आहे. शहरात ४६ तर पुणे ग्रामीण आणि कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये प्रत्येकी १ अशी ४८ रुग्णसंख्या झाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

या नव्या रुग्णांमध्ये शिवणे येथील २५ वर्षीय गर्भवती महिलेचा समावेश आहे. या महिलेला ताप, पुरळ, अंगदुखी आणि डोकेदुखी अशी लक्षणे आढळल्याने तिचे नमुने २२ जुलै रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले होते. ही महिला २० आठवड्यांची गर्भवती आहे. अशामध्ये या नव्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची देखील रक्त तपासणी केली जात आहे. पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना आणि गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT