ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात अनेक आजार होण्याची शक्यता असते. परंतु काही दिवसांपासून झिका वायरसचा संसर्ग वाढताना दिसतोय.
झिका वायरस डेंग्यूचे डास चावल्यामुशे होतो. झिका वायरसने पीडित रूग्णांमध्ये डेंग्यू व चिकनगुनियासारखीच लक्षणे दिसून येतात.
झिका वायरस झालेल्या रुग्णांना तज्ञं घरामघ्ये आराम करण्यासा सल्ला देतात. डेंग्यूचे डास सामान्यत: दिवसा चावतात.
झिका वायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून या टिप्स नक्की फॉलो करा.
डासांचा प्रादुर्भाव असलेल्या भागात राहत असाल तर घराच्या दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा.
उकळलेल्या आणि प्युरिफाईड पाण्याचे सेवन करणे योग्य ठरेल.
तुम्हाला २ दिवसांहून अधिक दिवस ताप असल्यास तज्ञांचा सल्ला आणि योग्य उपचार घ्या.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.