ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा येताच अनेक आजारांचा संसर्ग होण्यास सुरुवात होते.
पावसाळ्यात अनेक लोकांना बॅक्टिरियल इंफेक्शन होण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात डेंग्यू, टायफॉइड सारख्या समस्या होण्याची शक्यता असते.
डेंग्यूचा संसर्ग इजिप्ती नावाच्या डासांमुळे होतो. डेंग्यू झाल्यावर अचानक १०२ पर्यंतचा ताप येऊ शकतो.
पावसाळ्यात अंग झाकतील असे कपडे घालण्यास सुरुवात करा.
पावसाळ्यात व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करा यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढेल.
घरातील बेसिनमध्ये पाणी साचून राहू नये याची काळजी घ्या. त्यासोबतच घराच्या साफसफाईकडे लक्ष द्या.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.