Pune Drugs Case  Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune News: पुण्याची तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात, कारवाईसाठी पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये; ११९ जणांच्या नावाची लिस्ट तयार

Pune Drugs Case: अमली पदार्थांचा साठा आणि त्याची साखळी तोडण्याची पुणे पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. ड्रग्स तस्करी यांच्यावर कारवाई केल्यानंतर आता सेवन करणाऱ्यांवर पुणे पोलिसांचे लक्ष आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील तरुणाई सध्या ड्रग्जच्या विळख्यामध्ये अडकली आहे. पुण्यामध्ये ड्रग्ज पार्टी होत असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. या ड्रग्ज पार्टींवर पुणे पोलिसांनी धाडी टाकत अनेकांना अटक देखील केली आहे. अशामध्ये आता पुण्यात ड्रग्जचे सेवन करणारे ११९ जण पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत. या ११९ जणांमध्ये पुण्यातील तरुण-तरुणींचा समावेश आहे. पुणे पोलिस सध्या अॅक्शन मोडमध्ये आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमली पदार्थांचा साठा आणि त्याची साखळी तोडण्याची पुणे पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. ड्रग्स तस्करी यांच्यावर कारवाई केल्यानंतर आता सेवन करणाऱ्यांवर पुणे पोलिसांचे लक्ष आहे. ड्रग्स विकत आणि त्याचे सेवन करणाऱ्या तब्बल ११९ जणांची यादीच पुणे पोलिसांनी तयार केली आहे.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील विश्रांतवाडी भागातून तीन जणांना अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली आहे. याचा सखोल तपास सध्या सुरू आहे.

पुणे पोलिसांकडून फक्त तस्करी करणाऱ्यांवर कारवाई न करता आता थेट सेवन करणाऱ्यांवर सुद्धा कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. ड्रग्सचे सेवन करणाऱ्या तरुणांमध्ये याची जनजागृती व्हावी यासोबतच खाकीचा धाक रहावा यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. याशिवाय अशा व्यक्तींच्या चौकशीतून ड्रग्स विक्री करणारे आणखी कुठली नावे निष्पन्न होतात का? याचा देखील तपास पोलिस करणार आहेत, अशी माहिती निखिल पिंगळे यांनी दिली.

दरम्यान, पुणे ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी मोठी कारवाई केली होती. याप्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली होती. यामधील एक जण कुरिअरद्वारे ड्रग्ज विकत होता. तर इतर दोघांना ड्रग्ज खरेदी करताना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेला आरोपी पुणे शहरासह पुण्याच्या बाहेर देखील ड्रग्जची विक्री करत होता.

विश्रांतीवाडीतून आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून १ कोटी किंमतीचा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला होता. पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर पुणे पोलिसांसोबत पुणे महानगर पालिका देखील अॅक्शन मोडमध्ये आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर पुण्यातील अनधिकृत पब, हॉटेल, बारवर कारवाई सुरू आहे. पुणे शहर आणि आसपासच्या परिसरातील पब आणि बारवर कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT