Shocking  Saam tv
मुंबई/पुणे

Shocking : चालक आणि नर्सच्या प्रेमाचा धक्कादायक शेवट! गर्लफ्रेंडनेच कुऱ्हाडीने वार करून बॉयफ्रेंडला संपवलं

pune Shocking : पुण्यात चालकाच्या हत्या प्रकरणी आरोपी गर्लफ्रेंडला जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच तिला दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

Vishal Gangurde

प्रेमसंबंधातून पैशांवरून झालेल्या वादातून बॉयफ्रेंडची हत्या

आरोपी सविता जाधवनं बॉयफ्रेंड प्रविणला कुऱ्हाडीने वार करून संपवलं

पिंपरी चिंचवडच्या विठ्ठलनगरमध्ये 2018 साली घडली होती घटना

पुणे न्यायालयाकडून आरोपी सविताला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा

पैशांवरून झालेल्या भांडणातून गर्लफ्रेंडने वाहन चालक बॉयफ्रेंडला कुऱ्हाडीने वार करून संपवलं. सात वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात आरोपी गर्लफ्रेंडला पुणे न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. कोर्टाकडून आरोपी गर्लफ्रेंडला जन्मठेप आणि पंचवीस हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सविता प्रकाश जाधव असे आरोपी महिलेचे नाव आहे. तर प्रवीण ज्ञानोबा भाग्यवंत असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हत्या केल्या प्रकरणी मृत प्रवीणच्या पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. ही घटना 3 सप्टेंबर 2018 रोजी सायंकाळी पिंपरी चिंचवडमध्ये विठ्ठलनगर येथील एका सोसायटीत घडली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

प्रवीण भाग्यवंत हा पिंपरी-चिंचवड महापालिकेत वाहन चालक म्हणून कार्यरत होता. तर सविता ही नर्स म्हणून काम करायची. दोघांमध्ये आठ वर्षापासून प्रेमसंबंध होते. त्यांच्यात पैशाच्या कारणांवरून वाद सुरू होते. त्यातून सविताने प्रविणच्या गळा, छाती आणि डोक्यात कुऱ्हाडीने वार केले होते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रवीणचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सविताला अटक करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. यावरून पुणे सत्र न्यायालयाने सविताला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

घटना कुठे घडली होती?

पिंपरी चिंचवडमधील विठ्ठलनगर येथील एका सोसायटीत ही घटना घडली होती.

मृत व्यक्ती कोण?

आरोपी महिलेचे नाव सविता प्रकाश जाधव आहे. ती नर्स आहे. मृताचे नाव प्रवीण ज्ञानोबा भाग्यवंत असून तो कार चालक होता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, भुजबळांसह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Date Ice Cream : घरच्या घरी बनवा टेस्टी खजूर आईसक्रीम, लहान मुलं आवडीने खातील, वाचा सोपी रेसिपी

Budget 2026: जुनी कर प्रणाली रद्द होणार? अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता

Married Tips: बायको नवऱ्याच्या डाव्या बाजूला का झोपते?

SCROLL FOR NEXT