Pune Crime News saam tv
मुंबई/पुणे

Pune News: विद्येचे माहेरघर पुणे बनतंय 'ड्रग्स हब', मागील १० महिन्यांची आकडेवारी चिंता वाढवणारी

Pune Crime News : पुण्यात गेल्या काही महिन्यात कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय बडवे

Pune News:

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनेक ठिकाणी ड्रग्ज जप्ती केली आहे.

पुण्यात गेल्या काही महिन्यात कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. 'उडता पुणे' या ठिकाणी गेल्या 10 महिन्यात तब्बल 12 कोटी 22 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. 1 जानेवारी ते 30 सप्टेंबरपर्यंत पुण्यात 1033 किलो गांजा तर 120 किलो अफिम जप्त करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरुन हे अमली पदार्थ राज्यात येत आहे. नाजेरिया, घाना या देशातून ड्रग्ज राज्यात येत आहे. तर देशात गोवा आणि आंध्र प्रदेशमधून ड्रग्जचा पुरवठा केला जात आहे. पुण्यात गेल्या ४ दिवसापासून सुरू असलेल्या ललित पाटील पलायन प्रकरणाच्या मुळाशी जात असताना पोलिसांकडून ड्र्ग्स प्रकरणाचं मोठं रॅकेट उघड होत आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पब संस्कृतीमध्ये ड्रग्जचे सेवन मोठ्या प्रमाणात

बदलत्या संस्कृतीचा तरुण मुलांवर, विद्यार्थ्यांवर परिणाम होत आहे. नवीन पब संस्कृतीमुळे मुले ड्रग्जच्या आहारी गेल्याचे आढळून आले आहे.

1 ऑक्टोबरपर्यंतची सर्वाधिक अमली पदार्थ जप्त आकडेवारी (किमती आणि गुन्हे)

  • मेफेड्रोन: 6 कोटी 91 लाख 66 हजार (39 गुन्हे)

  • गांजा: 2 कोटी 7 लाख 90 हजार (50 गुन्हे)

  • एल एस डी: 1कोटी 12 लाख 64 हजार (2 गुन्हे)

  • चरस: 48 लाख 2 हजार (4 गुन्हे)

  • अफिम: 47 लाख 82 हजार (9 गुन्हे)

  • हेरॉईन: 46 लाख 89 हजार (1 गुन्हे)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi: PM किसान योजनेत बाप-लेक दोघांनाही मिळू शकतात 2000 रुपये? जाणून घ्या नियम...

भाजप नगरसेवकांच्या घरावर बुलडोझर फिरणार? मनपाच्या नोटीसनंतर नेत्यांची धडधड वाढली

पेट्रोल-डिझेलसाठी रांगा आणि राडे, मराठवाडा, विदर्भात इंधनाचा तुटवडा

नीट पेपरफुटी घोटाळा उघड; 75 विद्यार्थ्यांना लाखोंमध्ये प्रश्नपत्रिका विक्री?

Maharashtra News Live Update: उडीसाहून रेल्वेने उल्हासनगरात २१ किलो गांजाची तस्करी उघड

SCROLL FOR NEXT