Ravindra Dhangekar Saam TV
मुंबई/पुणे

Ravindra Dhangekar: पुण्यात अनेक ललित पाटील; ड्रग्स प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट.. आमदार रविंद्र धंगेकरांचे गंभीर आरोप

Ravindra Dhangekar On Pune Narcotics Case: ड्रग्स प्रकरणी आंतराष्ट्रीय रॅकेट टोळी आहे. पुण्यात अनेक ललित पाटील कार्यरत आहेत." असे गंभीर आरोप रविंद्र धंगेकर यांनी केले.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. २२ फेब्रुवारी २०२४

Pune Narcotics Case Update:

ललित पाटील प्रकरणानंतर पुणे शहर पुन्हा एकदा ड्रग्ज प्रकरणाने चर्चेत आले आहे. पुणे शहरातील कुरकूंभ येथे ड्रग्ज कारखाना सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अशातच या ड्रग्ज प्रकरणाचे थेट लंडन कनेक्शन समोर आले आहे. यावरुन कसबा मतदार संघाचे काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवरवर गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाले रविंद्र धंगेकर?

"पुण्यात आणि इतर ठिकाणी ४००० कोटी रुपयांचे ड्रग्स मिळून आले आहेत. पुणे जिल्ह्यात ड्रग्स बनवण्याचा कारखाना मिळाला. ललित पाटील प्रकरणाचा तपास सरकारने पूर्ण केला नाही. सरकारने संजीव ठाकूर यांना पाठीशी घालून कुठली ही कारवाई त्यांच्यावर केली नाही, ललित पाटील (Lalit Patil) प्रकरण वेळीस मी म्हणालो होतो की ड्रग्स प्रकरणी आंतराष्ट्रीय रॅकेट टोळी आहे. पुण्यात अनेक ललित पाटील कार्यरत आहेत." असे गंभीर आरोप रविंद्र धंगेकर यांनी केले.

तसेच " पुणे पोलीस आयुक्तांनी पबबाबत निर्णय घेतला मी दावा करतो की याच पबमध्ये ड्रग्स मिळतात. पब संस्कृती पुण्यात नसू नये, हे पुणेकरांचे मत आहे. ४००० कोटी रुपयांचे ड्रग्स सापडणे म्हणजे पुणे पोलिसांचे अपयश कारण पोलिसांची यंत्रणा करतेय काय? गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांची एल आय बी करतायत काय?" असा सवालही रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा लढवणार...

दरम्यान, यावेळी रविंद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कोणी समोर आलं तरी, पक्षाने संधी दिली तर लोकसभा (Loksabha Election 2024) लढणार आणि जिंकणार, असा विश्वास रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT