Manoj Jarange Patil Rally  Saamtv
मुंबई/पुणे

Manoj Jarange Patil: पुण्यात मनोज जरांगेंची शांतता रॅली; २०-२५ लाख मराठा बांधव सहभागी होणार

Manoj Jarange Patil Rally In Pune: मराठा समाजाची पुण्यामध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली येत्या ११ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली.

Priya More

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची पुढच्या महिन्यामध्ये शांतता रॅली होणार आहे. या शांतता रॅलीची तारीख आणि वेळ ठरली आहे. यासंदर्भात मराठा समाजाची पुण्यामध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची शांतता रॅली येत्या ११ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली.

पुण्यात अखंड मराठा समजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली होणार आहे. ११ ऑगस्ट रोजी या शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता या रॅलीला सारसबाग येथील गणपती मंदिरापासून सुरूवात होणार आहे. या रॅलीदरम्यान ते बाजीराव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मिलिटरी स्कूल येथील शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर जंगली महाराज रोडवरून डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला ते अभिवादन करणार आहेत.

२० ते २५ लाख मराठा समाज या रॅलीत सहभागी होतील अशी अपेक्षा मराठा सेवकांनी व्यक्त केली. या शांतता रॅलीनंतर अलका टॉकीज चौकात सभा घेऊन मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला संबोधित करतील. मराठा राजकीय नेत्यांनी चिन्ह आणि पद बाजूला ठेवून सर्वसामान्य मराठा म्हणून रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन या पत्रकार परिषदेदरम्यान करण्यात आले.

पुण्यात आदर्श रॅली होणार आहे. सर्व समाजाने त्या दिवशी आम्हाला सहकार्य करावे. अखंड मराठा समाज म्हणून पुढे आता काम करणार आहोत. त्या दिवशी मराठा समाजाने एकत्रित यावे.', असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. तसंच, शांतता रॅलीदरम्यान दुकानं बंद होणार नाही, काहीही बंद होणार नाही. या रॅलीच्या दिवशी जवळपास २ हजार सेवक असणार आहेत. त्याचसोबत रॅलीदरम्यान पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. आम्ही कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊ, असे देखील मराठा सेवकांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT