PuneNEws  Saam TV
मुंबई/पुणे

माझ्याकडे ऑडी कार आहे... पत्ता विचारल्याच्या रागातून अंगावर घातली गाडी, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पोलिसांनी ऑडी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन जाधव

पुणे : एखाद्या नवीन ठिकाणी गेलं की पत्ता माहिती नसेल तर आपण तिथे उपस्थित असणाऱ्यांना याबाबत विचारतो. पत्ता विचारणे ही सामान्य बाब आहे. मात्र पुण्यातील एका घटनेने मात्र यापुढे पत्ता विचारण्याआधी विचार करावा लागू शकतो. पत्ता विचारल्याच्या रागातून ऑडी कारच्या मालकांनं एकाच्या पायावर गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.

विशाल सोनवणे असं तक्रारदाराचं नाव आहे. विशाल सोनवणे जंगली महाराज रस्त्यावर सुभद्रा हॉटेलसमोर उभे होते.त्यांना ज्ञानमुद्रा ट्यूटरियल क्लासेसचा पत्ता हवा होता. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी उभ्या असलेल्या ऑडी मालकाला ज्ञानमुद्रा ट्युटोरियल क्लास कुठे आहे? असं विचारलं. (Crime News)

मात्र विशाल यांनी पत्ता विचारुन चूक केली की काय असंच म्हणावं लागेल. कारण त्यावरून पत्ता विचारला म्हणून ऑडी मालक संतापला. तू कुणाला पत्ता विचारतोय माहिती आहे का? माझ्याकडे ऑडी आहे. मला पत्ता विचारून तू माझ्या स्टेटसला धक्का पोहोचवला आहेस, असं सांगत ऑडी मालकांनं विशाल सोनवणे यांच्यासोबत भांडायला सुरुवात केली.

वाद इतका विकोपाला गेला की ऑडी मालकानं विशाल सोनवणे यांना जबर मारहाण केली. इतकच नाही तर गाडी घेऊन निघून जात असताना त्याने विशालच्या पायावर गाडी घातली. त्यात विशाल जखमी झाले आणि त्यांना तात्काळ हॉस्पिटल गाठावं लागलं.याप्रकरणी विशाल यांनी पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी ऑडी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Interesting Facts : ट्रकच्या मागे 'हॉर्न ओके प्लिज' का लिहिलं जातं? ९९ टक्के माहीत नाही

Maharashtra News Live Update: वर्ध्यात गोरस भंडारावर एफडीएची कारवाई; २५.८६ लाखांचा दुग्धजन्य साठा जप्त

शिंदेसेनेच्या नगरसेवकाचे पद रद्द होणार? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष, राजकीय हालचालींना वेग

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

पुण्यात लवकरच 'डबल डेकर ट्विन टनल'; येरवडा ते कात्रजदरम्यान होणार उभारणी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

SCROLL FOR NEXT