Pune RTO News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune RTO News : वाहन चालकांनो लक्ष द्या! लायसन्स परीक्षेच्या तारखेत मोठा बदल

Pune News : पुण्यात राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.

Yash Shirke

Pune News : पुण्यामध्ये महाराष्ट्र मोटार वाहन विभागातर्फे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक अभियान २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने या कालावधीत वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण (Vehicle fitness certificate renewal) आणि पक्की अनुज्ञप्ती चाचणीच्या (Fixed License Test) तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक अभियानाचे पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे आयोजन करण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मोटर वाहन विभागाचे खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे गाड्यांची फिटनेस सर्टिफिकेट रिन्यूव्हल आणि चालकांची ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट पुढे ढकलण्यात आली आहे.

वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ज्या वाहन चालकांना ३१ जानेवारी - शुक्रवार हा दिवस आरक्षित करुन दिला होता. त्यांना पुढच्या आठवड्यात शनिवारी (८ फेब्रुवारी) सर्टिफिकेट रिन्यूव्हल करण्यासाठी जावे लागणार आहे. ८ फेब्रुवारी रोजी वाहने निरीक्षणाकरीता सादर करावी लागणार आहेत.

शिकाऊ व पक्क्या लायसन्ससाठी ३१ जानेवारी पूर्वनियोजित वेळ घेतलेल्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आले आहे. या उमेदवारांना ३ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत ड्रायव्हिंग लायसन्ससाठी हजर राहावे लागणार आहे. चाचणीच्या तारखेमधील बदलांची माहिती पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Session 2025: ऑपरेशन सिंदूरदरम्यान जगाने भारताची ताकद पाहिली, पावसाळी अधिवेशनापूर्वी PM मोदी काय म्हणाले?

Heart attack risk: फक्त 108 रुपये अन् 2 मिनिटांत हार्ट अटॅकचा धोका कळणार; पाहा नेमकं कसं?

Maharashtra Live News Update: झालं ते चुकीचं झालं, मारहाणीचा कडक शब्दात निषेध - तटकरे

Sabudana Rabdi Recipe: श्रावण सोमवारच्या उपवासाला काही खास हवंय? घरच्या घरी बनवा साबुदाणा रबडी, वाचा रेसिपी

Akola Crime : आधी मंगळसूत्र चोरलं, नंतर परत देत चोरट्यांनी महिलेला माफी मागितली; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT