Pune News Saam tv
मुंबई/पुणे

Pune News : वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचे आमिष; ७० लाखात फसवणूक

Pune News : पुण्यातील कसबा पेठ परिसरात वास्तव्यास असलेल्या तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाने कसबा पेठेत राहायला आहेत. त्यांचा मुलास वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश हवा होता

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : पुण्यातील एका नामवंत महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमाला मुलाचा प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune) पुण्याच्या कसबा परिसरातील ज्येष्ठ नागरिकाची ६९ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक (Fraud) करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Tajya Batmya)


पुण्यातील कसबा पेठ परिसरात वास्तव्यास असलेल्या तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाने कसबा पेठेत राहायला आहेत. त्यांचा मुलास वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश हवा होता. यामुळे ते महाविद्यालयात (Medical Collage) फिरत तपास करत होते. दरम्यान साधारण वर्षभरापूर्वी त्यांची ओळख सुनील गडकर याच्याशी एका परिचितामार्फत झाली होती. त्यावेळी गडकरने नामवंत वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष तक्रारदारांना दाखविले होते. यावर त्यांनी विश्वास ठेवला. 


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गडकर यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारदाराने प्रवेशासाठी ६९ लाख ७० हजार इतकी रक्कम गडकर यास दिली. मात्र वर्ष होऊन देखील प्रवेश मिळाला नाही. पैशांची मागणी केल्यानंतर रक्कम देखील परत मिळाली नाही. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस (Police) ठाण्यात फिर्याद दिली असून सुनील नामदेव गडकर (वय ३२, रा. गणेशयोग सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या आमदाराचे समर्थक महिलांना त्रास देतात, भाजपच्या महिला आमदाराचा खळबळजनक आरोप

मुलांच्या संगोपनासाठी पुरूषांनाही 365 दिवस सुट्टी? महिला आयोगाची केंद्र सरकारकडे मोठी शिफारस

बोगस शिक्षक भरती प्रकरणातील मुख्य सूत्रधार सापडला; शिक्षणमंत्र्यांच्या गावातच ठोकल्या बेड्या

गोकुळच्या खाजगीकरणासाठी 200 कोटींची ऑफर; ऐन निवडणुकीत माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

Maharashtra News Live Update: MPSCच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्या, एका प्रामाणिक व पात्र अधिकाऱ्याची नियुक्ती करा- राहुल गांधींची मागणी

SCROLL FOR NEXT