Shiv Premis confront youths for drinking liquor on Raireshwar Fort; viral video sparks outrage online. saamtv
मुंबई/पुणे

Raireshwar Fort: भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर दारू पार्टी; मद्यपींना शिवप्रेमींकडून चोप, व्हिडिओ व्हायरल

Raireshwar Fort Liquor Party: पुण्यातील ऐतिहासिक रायरेश्वर किल्ल्यावर दारू पिऊन पार्टी करणाऱ्या तीन तरुणांना शिवप्रेमींनी चोप दिलाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Bharat Jadhav

  • रायरेश्वर किल्ल्यावर तीन तरुणांची दारू पार्टी

  • दारू पार्टी करणाऱ्यांना शिवप्रेमींनी दिला चोप

  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

सचिन जाधव , साम प्रतिनिधी

पुण्यातील भोरमधील रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरात दारू पार्टी करणाऱ्या तीन तरुणांना शिवप्रेमींनी चोप दिलाय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या शिवप्रेमींना तीन तरुण दारू पार्टी करताना दिसले. त्यावेळी शिवप्रेमींनी जाब विचारला, त्यानंतर दारूच्या बाटल्या फोडून त्यांना चोप दिला.

शिवप्रेमींनी त्यांना जाब विचारत ते कुठून आल्याचं विचारलं. त्यांच्या नावाची चौकशी केली. किल्ल्याच्या परिसरात दारू पिण्यास परवानगी आहे का? दारु का आणली सोबत? हा परिसर कोणता आहे माहिती आहे असे प्रश्न करत शिवप्रेमींनी पार्टी करणाऱ्यांना चांगलाच चोप दिलाय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागलाय.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरात अशाप्रकारे मद्य प्राशन करण्याचा प्रकार समोर आला. शिवप्रेमी आणि गडप्रेमींकडून सोशल मीडियावर या घटनेवर संताप व्यक्त करत याचा निषेध केला जातोय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haldi Milk Benefits: दररोज सकाळी हळदीचे दूध प्यायल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Live News Update: शहादा नगरपरिषद निवडणुकीत एमआयएम पक्ष मैदानात

Wakad Tourism: थंडीच्या दिवसात फिरायला जायचंय? वाकडजवळ असलेला हा किल्ला ठरेल बेस्ट ऑप्शन

Ravindra Chavan : मनसेचा बडा नेता भाजपमध्ये जाणार? रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

'गौरीला मारहाण व्हायची, चेहऱ्यावर खुणा, नणंद म्हणायची..' गौरी गर्जे प्रकरणात अंजली दमानियांकडून धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT